Lokmat Sakhi >Social Viral > रंग-स्केचपेन-मार्करने मुलांनी घराच्या भिंती रंगवल्या? पाहा भिंतींवरचे डाग काढण्याची १ भन्नाट ट्रिक...

रंग-स्केचपेन-मार्करने मुलांनी घराच्या भिंती रंगवल्या? पाहा भिंतींवरचे डाग काढण्याची १ भन्नाट ट्रिक...

How To Remove Pen, Pencil, Crayon Marks From Wall : How to Get Crayon Marks Off Walls Without Removing Paint : घराच्या भिंती मुलांनी खडू, स्केचपेन, मार्करने रंगवल्या म्हणून त्यांना ओरडू नका त्याऐवजी करा एक सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2024 01:13 PM2024-07-12T13:13:21+5:302024-07-12T15:24:04+5:30

How To Remove Pen, Pencil, Crayon Marks From Wall : How to Get Crayon Marks Off Walls Without Removing Paint : घराच्या भिंती मुलांनी खडू, स्केचपेन, मार्करने रंगवल्या म्हणून त्यांना ओरडू नका त्याऐवजी करा एक सोपा उपाय

How To Remove Pen, Pencil, Crayon Marks From Wall 1 Effective Ways to Remove Crayon & Pencil Marks from Walls How to Get Crayon Marks Off Walls Without Removing Paint | रंग-स्केचपेन-मार्करने मुलांनी घराच्या भिंती रंगवल्या? पाहा भिंतींवरचे डाग काढण्याची १ भन्नाट ट्रिक...

रंग-स्केचपेन-मार्करने मुलांनी घराच्या भिंती रंगवल्या? पाहा भिंतींवरचे डाग काढण्याची १ भन्नाट ट्रिक...

घरात लहान मुल असलं की पसारा होणारच. घरात लहान मुलं असलं की ते कधी काय करतील याचा काही नेम नसतो. ज्या घरात लहान मुलं असतात त्यांच्या घरातील व्यक्तींना त्यांच्याकडे फारच बारकाईने लक्ष द्यावे लागते. मुलं जरा कळत्या वयाची झाली की त्यांना खूप काही नवीन नवीन गोष्टी करायच्या असतात. घराच्या भिंतींवर खडू, स्केचपेन, मार्करने रेघोट्या ओढणे असा प्रकार प्रत्येक घरातील लहान मुलं करतातच. काहीवेळा तर मुलं नकळत घराच्या अनेक भिंतीच्या भिंती रंगवून ठेवतात. यामुळे मुलांची तर मजा होते पण त्यांच्या आईला हे सगळं साफ करण्याची सजा मिळते( 1 Effective Ways to Remove Crayon & Pencil Marks from Walls).

घरातील लहान मुलांनी जर अशा भिंती खडू, स्केचपेन, मार्करने रंगवल्या तर ते दिसतांना खूपच वाईट दिसते. त्याचबरोबर, आपण एवढ्या महागामोलाचा रंग खरेदी करुन भिंती रंगवतो. परंतु मग मुलांनी जर का असे काही केले तर पालकांची चिडचिड तर होतेच. याशिवाय, खडू, स्केचपेन, मार्करचे भिंतींवरील डाग नेमके काढावेत कसे असा प्रश्न पडतो. काहीवेळा आपण साबण घासणी घेऊन तासंतास या डागांवर घासतो. अशावेळी भिंतींचा ओरिजिनल रंग निघून जाऊ शकतो, यामुळे भिंती अतिशय (How to Get Crayon Marks Off Walls Without Removing Paint) खराब दिसू शकतात. त्यामुळे फारशी मेहेनत न घेता हे डाग अगदी सोप्या पद्धतीने कसे काढावेत यासाठी एक सोपी युक्ती नक्की करुन पाहा. या ट्रिकमुळे भिंतींवरील खडू, स्केचपेन, मार्करचे डाग अगदी चुटकीसरशी नाहीसे होतील. फारसे कष्ट न घेता घराच्या भिंती पुन्हा पाहिल्यासारख्या नव्या - चकचकीत दिसू लागतील(How To Remove Pen, Pencil, Crayon Marks From Wall).

साहित्य :- 

१. टूथपेस्ट 
२. डेटॉल 
३. स्पंज 
४. घासणी 
५. पाणी 

डब्यात ठेवलेल्या चपात्या वाफेने भिजून ओल्या होतात ? ५ सोप्या ट्रिक्स, चपाती सादळणार नाही...

पावसाळ्यात फ्लोअर मॅटचा कुबट वास त्रासदायक, न धुता फ्लोअर मॅट स्वच्छ करण्याचे ६ उपाय...

कृती :- 

१. एका मोठ्या बाऊलमध्ये टूथपेस्ट घेऊन त्यात थोडेसे डेटॉल मिक्स करुन घ्यावे. 
२. त्यानंतर हे घट्ट मिश्रण पातळ करण्यासाठी यात गरजेनुसार पाणी घालावे. 
३. आता एखादा जुना ब्रश किंवा स्पंजच्या मदतीने हे तयार द्रावण खडू, स्केचपेन, मार्करच्या डागांवर लावून घ्यावे. 

काय सांगता ! जगातील पहिली "मिस एआय" स्पर्धा, विजयानंतर मिस एआय मॉडेल म्हणाली..

४. त्यानंतर हलकेच ब्रश किंवा घासणीने घासून घ्यावे. 
५. आता सगळ्यात शेवटी एक नॅपकिन स्वच्छ पाण्यांत भिजवून त्याने संपूर्ण भिंत पुन्हा एकदा स्वच्छ पुसून घ्यावी. 

या सोप्या ट्रिकचा वापर करून आपण घराच्या भिंतींवरील खडू, स्केचपेन, मार्करचे डाग अगदी काही मिनिटांत फारसे कष्ट न घेता सहजपणे काढू शकतो .

Web Title: How To Remove Pen, Pencil, Crayon Marks From Wall 1 Effective Ways to Remove Crayon & Pencil Marks from Walls How to Get Crayon Marks Off Walls Without Removing Paint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.