आजकाल अनेकांच्या घरात वेस्टर्न टॉयलेटचा वापर होतो (Western Toilet). वेस्टर्न टॉयलेटमध्ये कमोड आणि हॅन्ड जेट शॉवर स्प्रे वापरला जातो. स्प्रेचा वापर दररोज केला जातो (Jet Spray Cleaning). पण अधिक काळ याचा वापर केल्याने हॅन्ड जेट शॉवर स्प्रे ब्लॉक होते, किंवा त्यातून पाणी येणं बंद होतं (Cleaning Tips). हे गंजामुळे किंवा क्षारयुक्त पाण्यामुळे ब्लॉक होते. यामुळे स्प्रेमधून पाणी नीट येत नाही अडकून राहते.
जेट स्प्रे साफ करण्यासाठी आपल्याला प्लंबरला बोलवावे लागते, ज्यामुळे आपला खर्चही वाढतो. जर आपल्याला प्लंबरला न बोलावता, घरीच हॅन्ड जेट शॉवर स्प्रे स्वच्छ करायचं असेल तर, फक्त इनोचा वापर करा. इनोच्या वापराने हॅन्ड जेट शॉवर स्प्रेवरील गंजाचे डाग स्वच्छ होतील, शिवाय ब्लॉक झालेलं स्प्रे पुन्हा नव्याने काम करेल(How To Remove Rust From Bathroom Water Spray?).
किचनमध्ये झुरळांची फौज? बेकिंग सोडा - लवंगांचा सोपा उपाय - मिनिटात झुरळं गायब - घर दिसेल स्वच्छ
हॅन्ड जेट शॉवर स्प्रे कसे स्वच्छ करावे?
- हॅन्ड जेट शॉवर स्प्रे स्वच्छ करण्यासाठी एक प्लास्टिकची पिशवी घ्या. ती पिशवी उघडा, त्यात एक चमचाभर इनो घाला. नंतर त्यात एक कप व्हिनेगर घालून मिक्स करा. आता प्लास्टिकच्या पिशवीत हॅन्ड जेट शॉवर स्प्रे घालून, घट्ट गाठ बांधा.
टपरीवर मिळतात तशी टम्म फुगलेली बटाट्याची भजी करायची आहेत? पिठात घाला ‘हा’ पदार्थ, खा कुरकुरीत भजी
- एक तासासाठी हॅन्ड जेट शॉवर स्प्रे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तसेच ठेवा. तासाभरानंतर टूथब्रशने हॅन्ड जेट शॉवर स्प्रे स्वच्छ घासून काढा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या
हॅन्ड जेट शॉवर स्प्रे स्वच्छ करण्यासाठी दुसरी ट्रिक
हॅन्ड जेट शॉवर स्प्रे बेकिंग पावडरच्या मदतीनेही स्वच्छ करता येऊ शकते. यासाठी एका बाऊलमध्ये बेकिंग पावडर, डिशवॉशिंग लिक्विड आणि व्हाईट व्हिनेगर समप्रमाणात घेऊन मिक्स करा. काही वेळ जेट स्प्रे मिश्रणात बुडवून ठेवा. नंतर ब्रशने स्वच्छ घासून काढा, व पाण्याने धुवून घ्या.