Join us

चमचे-काटे गंजलेत? ते फेकू नका, २ उपाय-गंजही निघेल-चमचे चकाकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2023 14:24 IST

How to Remove Rust From Spoon - Forks स्टीलचे काटे आणि चमचे गंजले तर ते वापरता येत नाही, त्यासाठीच हे उपाय

स्टीलचे चमचे व काटे हे आपल्या स्वयंपाक घरात असतातच. मात्र कालांतराने या चमच्यांवर गंज चढू लागतो. स्टेनलेस स्टीलला सहसा गंज चढत नाही, असे अनेकांना वाटते. पण असे नाही, चमचा आणि काट्याच्या पृष्ठभागावरील क्रोमियमचा थर निघाल्यावर त्याला गंज पकडते.

स्टेनलेस स्टील हे लोहाचे मिश्र धातू आहे. ज्यात १० टक्के क्रोमियम आढळते. ज्यामुळे त्याला गंज पकडते. अशा परिस्थितीत हे चमचे वापरणे योग्य नाही असे अनेकांना वाटते. चमच्यांवरील गंजाचे थर काढायचे असतील तर, हे काही घरगुती टिप्स फॉलो करून पाहा. या ट्रिक्समुळे चमचे नव्यासारखे चमकतील(How to Remove Rust From Spoon - Forks).

चमचा आणि काटा कसा साफ करावा

पहिला उपाय - सर्वप्रथम, एका वाटीत दोन कप पाणी घ्या, त्यात एक टेबलस्पून बेकिंग सोडा मिसळा, अशा प्रकारे घट्ट पेस्ट तयार करा. 

घरात मुंग्यांनी थैमान घातले आहे? ५ घरगुती उपाय, न मारता मुंग्यांना पळवून लावा..

टूथब्रशच्या मदतीने गंजलेल्या डागांवर बेकिंग सोडाची पेस्ट लावा. काही मिनिटानंतर ब्रशने चमचे व काटे घासून काढा.

ब्रशने घासून झाल्यानंतर ओल्या पेपर किंवा टॉवेलने चमचा पुसा. त्यानंतर चमचा व काटे धुवून काढा. अशा प्रकारे त्यातील गंज लवकर निघून जाईल.

दुसरा उपाय - स्टीलच्या, तसंच अन्य भांड्यांवरील गंज काढून टाकण्यासाठी आपण मीठ आणि लिंबाचा वापर करू शकता. 

शेगडीची फ्लेम कमी झालीय? ३ सोपे उपाय; वेळ वाचेल- होईल स्वयंपाक झरझर

एका भांड्यात २ चमचे मीठ घ्या व ते लिंबाच्या तुकड्यांवर लावा. गंज लागलेली भांडी - चमचे काटे, यांना लिंबाच्या तुकड्यानं घासा. काही मिनिटांतच भांड्यांवरचा गंज निघून गेल्याचं दिसेल. त्यानंतर पाण्याखाली ही भांडी स्वच्छ धुऊन घ्यावीत.

टॅग्स :किचन टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडिया