Join us

लेदरच्या वस्तूंपासून ते गाडीवरच्या स्क्रॅचेसपर्यंत, महागडे उपाय नको - खोबरेल तेल व्हिनेगरचा पाहा इन्स्टंट उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2025 15:50 IST

How To Remove Scratches From Wooden Furniture To Car With Coconut Oil & Vinegar : Coconut and Vinegar to Fix Car & Wooden Furniture Scratches : Coconut Oil & Vinegar Scratch Removal Experiment : फर्निचरपासून ते गाडीवर पडलेल्या ओरखड्यांपर्यंत सगळ्यांचं प्रकारचे स्क्रॅचेस दूर करण्यासाठी घरगुती उपाय...

आपल्या घरातील प्रत्येक वस्तूची आपण अतिशय काटेकोरपणे काळजी घेतो. परंतु काहीवेळा आपण खूप काळजी घेऊन देखील या वस्तूंवर ओरखडे पडतातच. घरातील लाकडी किंवा ॲल्युमिनियमचे फर्निचर असो किंवा लेदरच्या वस्तू तसेच आपली महागडी गाडी अशा वस्तूंवर पडलेला स्क्रॅच पाहून आपल्याला फार  दुःख होते. अशा घरातील महागड्या वस्तूंवर पडलेला ओरखडा (How To Remove Scratches From Wooden Furniture To Car With Coconut Oil & Vinegar) त्या वस्तूंची शोभा घालवतो.

वस्तूंवर पडलेला ओरखडा काहीवेळा अनेक उपाय करूनही जाता जात नाही. अशा वस्तूंवरील हा छोटासा ओरखडा देखील दिसताना चांगला दिसत नाही. एवढंच नाही तर अशा वस्तूंवरील ओरखड्यांमुळे या वस्तू किती नव्या असल्या तरीही त्या जुन्याच दिसू लागतात. यासाठी, घरातील अशा महागड्या वस्तूंवर जर ओरखडे पडले असतील तर ते काही मिनिटांतच (Coconut and Vinegar to Fix Car & Wooden Furniture Scratches) नाहीसे करून आपण या वस्तू पुन्हा पहिल्यासारख्या नव्या लख्ख करु शकतो. घरातील महागड्या फर्निचरपासून ते आपल्या गाडीवर पडलेल्या ओरखड्यांपर्यंत सगळ्यांचं प्रकारचे स्क्रॅचेस (Coconut Oil & Vinegar Scratch Removal Experiment) कायमचे गायब करण्यासाठी आपण घरातील खोबरेल तेल आणि व्हिनेगरचा वापर कसा करु शकतो ते पाहूयात. 

 फर्निचरपासून ते गाडीवर पडलेले ओरखडे नाहीसे करण्यासाठी घरगुती उपाय... 

घरातील महागड्या फर्निचरपासून ते आपल्या गाडीवर पडलेल्या ओरखड्यांपर्यंत सगळ्यांचं प्रकारचे स्क्रॅचेस कायमचे गायब करण्यासाठी एक घरगुती उपाय. यासाठी आपल्याला ४ ते ५ टेबलस्पून खोबरेल तेल आणि १ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. एका बाऊलमध्ये ४ ते ५ टेबलस्पून खोबरेल तेल आणि १ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर घेऊन ते एकत्रित मिक्स करून घ्यावे. आता हे मिश्रण गॅसच्या मंद आचेवर ठेवून १ ते २ मिनिटे हलके गरम करून घ्यावे. वस्तूंवरील स्क्रॅचेच काढण्यासाठी आपल्याकडे होममेड सोल्युशन तयार आहे. 

साबण - लिक्विड सोप नको, फक्त १ बर्फाचा तुकडा आणि नॉनस्टिक भांड्याचा तेलकटपणा होईल दूर...

या जादुई सोल्युशनचा वस्तूंवर वापर कसा करायचा? 

१. लाकडी फर्निचर किंवा इतर वस्तू :- घरातील इतर लाकडी वस्तू किंवा फर्निचरवरील ओरखडे काढण्यासाठी खोबरेल तेल आणि व्हाईट व्हिनेगरच्या द्रावणात एक सुती कापड बुडवून घ्यावे. त्यानंतर या सुती कापडाने हे तयार द्रावण लाकडी फर्निचरवर जिथे ओरखडा आला आहे त्यावर लावून तसेच ठेवावे. आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास हे ओरखडे हळूहळू कमी होण्यास अधिक मदत होते. 

२. अ‍ॅल्युमिनियम फर्निचर किंवा इतर वस्तू :- खेबरेल तेल आणि व्हाईट व्हिनेगर यांचे मिश्रण अ‍ॅल्युमिनियम कॅबिनेटवरील ओरखडे काढण्यासाठी देखील मदत करू शकते. त्याचा परिणाम पेंट किंवा पॉलिशच्या तुलनेत थोडा कमी असू शकतो.     

३. गाडीवरील ओरखडे :- जर इतर वस्तूंप्रमाणेच तुमच्या गाडीवर देखील असेच ओरखडे पडले असतील तर आपण या सोल्युशनचा वापर करुन शकता. यासाठी, एक सुती कापड घ्या आणि त्यावर तयार मिश्रण लावा. आता हे कापड गाडीच्या ओरखडा असलेल्या भागावर घासून घ्या. हा उपाय आठ्वड्यातुन किमान २ ते ३ वेळा केल्याने गाडीवरील ओरखडे कमी होऊ लागतात. 

चमचाभर मिठाने होतील घरातील 'ही' ८ कामं पटापट, चिमूटभर मिठाची ही पाहा जादू...

४. लेदरच्या वस्तू :- नारळ तेल आणि व्हिनेगर यांचे मिश्रण वापरल्याने केवळ फर्निचर किंवा कारवरील ओरखडे काढता येतात असे नाही तर चामड्याच्या वस्तूंना चमक देण्यास देखील मदत होते . यासाठी, प्रथम एक मायक्रोफायबर कापड घ्या आणि ते मिश्रणात बुडवा. आता लेदरच्या पिशव्या, जॅकेट किंवा बुटांवर असलेल्या ओरखड्यांवर कापड हलकेच घासा. या घरगुती उपायामुळेच, लेदरच्या वस्तूंवरील ओरखडे काढून टाकण्यास आणि चामड्याच्या वस्तूंना चमक येण्यास देखील मदत होऊ शकते.

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडीस्वच्छता टिप्स