Lokmat Sakhi >Social Viral > स्क्रॅच पडल्याने कार खराब दिसते? खोबरेल तेलाचा १ खास उपाय, ओरखडे होतील गायब

स्क्रॅच पडल्याने कार खराब दिसते? खोबरेल तेलाचा १ खास उपाय, ओरखडे होतील गायब

How to remove scuffs and scratches from your Car गाडीवर स्क्रॅच पडले की जीव हळहळतो त्यासाठीच हा घरच्याघरीच करता येईल असा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2023 02:36 PM2023-08-31T14:36:40+5:302023-08-31T14:46:15+5:30

How to remove scuffs and scratches from your Car गाडीवर स्क्रॅच पडले की जीव हळहळतो त्यासाठीच हा घरच्याघरीच करता येईल असा उपाय

How to remove scuffs and scratches from your car | स्क्रॅच पडल्याने कार खराब दिसते? खोबरेल तेलाचा १ खास उपाय, ओरखडे होतील गायब

स्क्रॅच पडल्याने कार खराब दिसते? खोबरेल तेलाचा १ खास उपाय, ओरखडे होतील गायब

आपली चारचाकी असो किंवा दुचाकी, गाडी दीर्घकाळ नवी कोरी दिसावी, असे प्रत्येकाला वाटते. लोकं आपल्या कारची तशी काळजीही घेतात. परंतु, गाडी चालवताना अनकेदा स्क्रॅच पडतात. हे स्क्रॅच अनेक कारणांमुळे पडतात. यामुळे गाडीचे सौंदर्य कमी होते.

गाडीवर पडलेला ओरखडा काढण्यासाठी मोठा भूर्दंड भरावा लागतो. जर आपल्याला घरबसल्या, घरच्या साहित्यात स्क्रॅच काढायचं असेल तर, ही भन्नाट ट्रिक फॉलो करून पाहा. या एका ट्रिकमुळे कार अगदी नवीन चकाचक दिसू लागेल. यासाठी कोणत्याही मेकॅनिककडे जायची गरज लागणार नाही. कोणतीही आहे ही भन्नाट ट्रिक पाहूयात(How to remove scuffs and scratches from your Car).

गाडीवरील स्क्रॅचचे डाग कमी करण्यासाठी लागणारं साहित्य

खोबरेल तेल

व्हिनेगर

माझा भाऊ कुठे दिसला तर कळवा! पोलीस महिलेचा व्हायरल व्हिडिओ, शोधतेय अपंग भावाला..

सर्वप्रथम, एका बाऊल समप्रमाणात खोबरेल तेल आणि व्हिनेगर घेऊन मिक्स करा. एक सुती कापड घ्या, त्यावर थोडे तयार लिक्विड घेऊन स्क्रॅचवर सातत्याने हळुवारपणे फिरवत राहा. स्क्रॅच पडल्यानंतर लगेच याचा वापर करा. जर गाडीवर पडलेले ओरखडे छोटे असतील, तर ते लवकर निघून जातील. पण जर स्क्रॅच मोठे असतील तर, आपल्याला मेकॅनिककडे जावं लागेल.

'डिजिटल इंडिया' - रक्षा बंधनासाठी खास क्युआर कोड मेहेंदी, भावाकडून पैसे घेण्याची हटके टेक्निक

सॅण्ड पेपरचा करा असा वापर

गाडीवरील स्क्रॅच काढण्यासाठी सॅण्ड पेपरचा वापर करून पाहा. यासाठी सॅण्ड पेपर दहा ते पंधरा मिनिटं पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर  कारवरील स्क्रॅचवर घासून घ्या. सॅण्ड पेपर स्क्रॅचवर जोमाने घासू नका. जोमाने घासल्यास गाडीचा रंग निघण्याची शक्यता असते. घासून काढल्यानंतर सुती कापडाने पुसून काढा. यामुळे स्क्रॅच कमी होईल.

Web Title: How to remove scuffs and scratches from your car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.