Lokmat Sakhi >Social Viral > नेहमीच्या वापरातील प्लॅस्टिकच्या डब्यांचे तेलकट डाग निघत नाहीत ? ४ सोपे उपाय, तेलकटपणा, दुर्गंधी होईल नाहीशी...

नेहमीच्या वापरातील प्लॅस्टिकच्या डब्यांचे तेलकट डाग निघत नाहीत ? ४ सोपे उपाय, तेलकटपणा, दुर्गंधी होईल नाहीशी...

How to remove stains and smells from your plastic lunch boxes : How to clean your plastic lunch box : प्लास्टिकचे डबे कितीही वेळा साबणाने घासून धुतले तरीही हे डाग जाता जात नाहीत, अशावेळी करा हे सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2024 04:34 PM2024-08-07T16:34:44+5:302024-08-07T16:50:32+5:30

How to remove stains and smells from your plastic lunch boxes : How to clean your plastic lunch box : प्लास्टिकचे डबे कितीही वेळा साबणाने घासून धुतले तरीही हे डाग जाता जात नाहीत, अशावेळी करा हे सोपे उपाय...

How to remove stains and smells from your plastic lunch boxes How to clean your plastic lunch box | नेहमीच्या वापरातील प्लॅस्टिकच्या डब्यांचे तेलकट डाग निघत नाहीत ? ४ सोपे उपाय, तेलकटपणा, दुर्गंधी होईल नाहीशी...

नेहमीच्या वापरातील प्लॅस्टिकच्या डब्यांचे तेलकट डाग निघत नाहीत ? ४ सोपे उपाय, तेलकटपणा, दुर्गंधी होईल नाहीशी...

आपण ऑफिसला जाताना किंवा मुलांना शाळेत डबा द्यायचा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे डबे वापरतो. आपण प्लास्टिकचे व स्टीलचे अशा दोन्ही प्रकारचे डबे वापरतो. स्टीलच्या डब्यांच्या तुलनेत प्लॅस्टिकचे डबे (Tips and Tricks To Clean Plastic Tiffin Box) हे वापरायला हलके असल्या कारणाने असे डबे वापरण्याला आपण प्राधान्य देतो. परंतु प्लॅस्टिकच्या डब्यांच्या तुलनेत स्टीलचे डबे स्वच्छ करण्यासाठी सोपे असतात. कधी कधीतरी प्लॅस्टिकच्या डब्यात काही तेलकट पदार्थ किंवा तेलकट भाजी नेल्यास ते सगळे तेल डब्याला चिकटते(Stain Free Plastic Containers).

पदार्थांतील हे तेल डब्याला तर चिकटतेच पण त्याचबरोबर डब्याच्या झाकणाच्या कडांमध्ये अडकून बसते. अशावेळी हे प्लॅस्टिकचे डबे कितीही वेळा साबणाने घासून धुतले तरी हे तेलाचे डाग जाता जात नाहीत. मग हे तेल कडांमध्ये तसेच राहून डब्ब्यांना कुबट वास येतो. अशावेळी हे तेलकट डबे स्वच्छ करण्यासाठी साबणाशिवाय इतर गोष्टींचा वापर करुन हे प्लॅस्टिकचे डबे स्वच्छ करू शकतो. हे प्लास्टिकचे तेलकट डबे नेमके कसे स्वच्छ करावेत ते पाहूयात(How to remove stains and smells from your plastic lunch boxes).

रोज वापरुन प्लॅस्टिकच्या डब्यातून कुबट दुर्गंधी येत असेल तर... 

१. बेकिंग सोडा :- बेकिंग सोडा हा साधारणपणे क्लिनिंग एजंट म्हणून वापरला जातो. प्लॅस्टिकच्या डब्यांतून येणारी कुबट दुर्गंधी घालवण्यासाठी आपण बेकिंग सोड्याची मदत घेऊ शकता. बेकिंग सोड्याच्या वापरामुळे डब्यांमधील तेलाचा चिकटपणाही दूर होईल. त्यासाठी मोठ्या भांड्यात किंवा बादलीत कोमट पाणी घेऊन, त्यात २ ते ३ चमचे बेकिंग सोडा घालावा. आता या द्रावणात प्लॅस्टिकचे डबे किमान ३० मिनिटे बुडवून ठेवून द्यावे. सगळ्यात शेवटी हे प्लॅस्टिकचे डबे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. 

२. लिंबू आणि मीठ :- बेकिंग सोड्या प्रमाणेच आपण लिंबाच्या रसाचा आणि मिठाचा वापर करु शकता. प्लॅस्टिकच्या डब्यातील डाग आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मीठ मिसळा. हे द्रावण थोडे थंड झाल्यावर या द्रावणात प्लॅस्टिकचे डबे बुडवून ठेवा. ५ मिनिटे डबे या द्रावणात असेच राहू द्यावे त्यानंतर डिशवॉशने हे डबे स्वच्छ करा.

कमोड स्वच्छ ठेवण्यासाठी महागडे फ्रेशनर- क्लिनर्स आणता? १ सोपा घरगुती उपाय, इन्फेक्शनही राहील दूर...

३. गरम पाणी आणि व्हिनेगर :- कोणत्याही भांड्यातील दुर्गंधी दूर करण्यासाठी गरम पाणी खूप उपयुक्त ठरते. कोमट पाण्यांत व्हिनेगर घालून या द्रावणात हे प्लॅस्टिकचे चिकट तेलकट डबे १० मिनिटे तसेच ठेवून द्यावेत. त्यानंतर स्वच्छ पाण्याने हे प्लॅस्टिकचे डबे धुवून घ्यावेत.

 ४. कॉफी पावडर :- प्लॅस्टिकच्या डब्यातून कुबट दुर्गंधी येत असेल तर ती घालवण्यासाठी आपण कॉफीचा वापर करु शकता. कॉफी पावडर घेऊन ती प्लॅस्टिकच्या चिकट तेलकट डब्यांत शिंपडून किमान १० मिनिटे ती तशीच राहू द्यावी. त्यानंतर हे प्लॅस्टिकचे डबे पाण्याने धुवून स्वच्छ करून घ्यावेत.

पावसाळ्यात साखर - गुळाच्या डब्याला मुंग्या लागल्या ? करा सोपे ६ उपाय, मुंग्या होतील कायम दूर... 

Web Title: How to remove stains and smells from your plastic lunch boxes How to clean your plastic lunch box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.