Lokmat Sakhi >Social Viral > कपडे न घासता- न रगडता ५ मिनिटांत निघतील कपड्यांवरचे डाग, साबण नको त्याऐवजी वापरा..

कपडे न घासता- न रगडता ५ मिनिटांत निघतील कपड्यांवरचे डाग, साबण नको त्याऐवजी वापरा..

कपड्यांवर भाजी, नेलपेण्ट, गंजाचे डाग (stains on clothes) लागले तर ते केवळ वाॅशिंग पावडर किंवा साबणानं काढणं शक्य होत नाही. अशा वेळेस भारीतल्या साबण आणि डिटर्जंटपेक्षाही स्वयंपाकघरातलं 5 रुपयाचं लिंबू (lemon for remove stains from clothes) कामास येतं. लिंबाच्या मदतीनं कसलेही डाग सहज घालवता येतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 03:56 PM2022-07-04T15:56:12+5:302022-07-04T16:05:54+5:30

कपड्यांवर भाजी, नेलपेण्ट, गंजाचे डाग (stains on clothes) लागले तर ते केवळ वाॅशिंग पावडर किंवा साबणानं काढणं शक्य होत नाही. अशा वेळेस भारीतल्या साबण आणि डिटर्जंटपेक्षाही स्वयंपाकघरातलं 5 रुपयाचं लिंबू (lemon for remove stains from clothes) कामास येतं. लिंबाच्या मदतीनं कसलेही डाग सहज घालवता येतात.

How to remove stains from clothes? Lemon is helping to remove stains from clothes. | कपडे न घासता- न रगडता ५ मिनिटांत निघतील कपड्यांवरचे डाग, साबण नको त्याऐवजी वापरा..

कपडे न घासता- न रगडता ५ मिनिटांत निघतील कपड्यांवरचे डाग, साबण नको त्याऐवजी वापरा..

Highlightsकपड्यांना जर नेलपेण्टचा डाग लागलेला असेल तर लिंबाच्या रसात थोडासा बेकिंग सोडा घालावा.कपड्यांना लागलेले भाजीचे डाग घालवण्यासाठी लिंबू मिठाचं मिश्रण वापरावं.लिंबाच्या रसानं चामड्याच्या चप्पल बुटांवरील/ पर्सवरील डागही सहज निघून जातात. 

कपडे घालून वावरताना कपड्यांवर डाग  (stains on clothes) लागण्याची शक्यता असतेच. पण आपल्या आवडत्या ड्रेसवर/ साडीवर कसलाही डाग पडला आणि तो निघाला नाही तर मग कितीही प्रिय असलेला ड्रेस किंवा साडी पुन्हा घालण्याची इच्छा होत नाही. एरवीही ऑफिसला जाताना, बाहेर जाताना कपडे स्वच्छच लागतात.  डाग असलेले कपडे घालून वावरताना संकोचल्यासारखं होतं. कपड्यांवर भाजी, नेलपेण्ट, गंजाचे डाग लागले तर ते केवळ  वाॅशिंग पावडर किंवा साबणानं काढणं शक्य होत नाही. अशा वेळेस भारीतल्या साबण आणि डिटर्जंटपेक्षाही स्वयंपाकघरातलं 5 रुपयाचं लिंबू (lemon for remove stains from clothes)  कामास येतं. लिंबाच्या मदतीनं कसलेही डाग सहज घालवता  (how to remove stain from clothes with lemon) येतात. 

Image: Google

लिंबाने कपड्यांचे डाग कसे जातील?

कपड्यांवर लागलेल्या डागांच्या प्रकारानुसार लिंबू वापरण्याची विशिष्ट पध्दत आहे. 

1. कपड्यांना जर नेलपेण्टचा डाग लागलेला असेल तर लिंबाच्या रसात थोडासा बेकिंग सोडा घालावा. हे मिश्रण कपड्यांवर जिथे नेलपेण्टचा डाग लागलेला आहे तिथे लावून 10 मिनिटं ठेवावं. नंतर पाण्यानं कपडा धुवावा. या पध्दतीनं कपड्यांवरील नेलपेण्टचा डाग सहज निघून जातो. 

2. जेवताना कपड्यांवर भाजीचे, लोणच्याचे डाग तर हमखास पडतात. भाज्या आणि लोणच्यामधील हळदीमुळे हे डाग काढणं अशक्य होतं. हे डाग काढण्यासाठी त्या भागावर जर साबण किंवा डिटर्जंट जास्त लावली तर ते डाग आणखीनच गडद होतात. त्यामुळे भाजी/ लोणच्याचे डाग काढताना साबणाचा वापर करु नये, त्याऐवजी लिंबू वापरावं. लिंबाच्या मदतीनं कपड्यांवरील भाजीचे डाग काढण्यासाठी लिंबाच्या रसात थोडं मीठ घालावं. लिंबू मिठाचं मिश्रण भाजींच्या डागांवर लावून ब्रशनं तेवढा भाग हळूवार घासावा. या उपायानं भाजीचे डाग सहज निघून जातात. 

Image: Google

3. कपड्यांना गंजलेल्या वस्तूंच्या गंजाचे लालसर डाग लागल्यास ते घालवण्यासाठी डिटर्जंट पावडरमध्ये थोडा लिंबाचा रस घालावा. लिंबू आणि डिटर्जंटचं मिश्रण गंजाचे डाग चटकन घालवतात आणि यामुळेही कपडेही चमकतात. 

4. कपड्यांवर भाज्यांची स्मुदी करताना, फळांचा रस काढताना डाग लागले तर ते काढणं मोठं कठीण काम होतं. यासाठी पाऊण  कप लिंबाचा रस आणि  पावणेतीन कप पाणी असं मिश्रण करावं. हे मिश्रण डागांवर घालून तिथे हळूवार घासावं. लिंबाच्या पाण्याचं मिश्रण टाकत एक दोनादा घासल्यावर तिथे थोडा साबण लावून कपडा धुवून  घेतल्यास  डाग निघून जातो.

Image: Google

5. लिंबाच्या मदतीनं लेदरच्या पर्स आणि चप्पल बूटही स्वच्छ करता येतात. यासाठी कपड्यावर लिंबू पिळून घ्यावं आणि त्या कापडानं बूट/ चप्पल किंवा पर्सवर लागलेले डाग हळूवार घासून पुसून घ्यावेत. या उपायानं डाग झटक्यात निघून जातात आणि चपला बुटांना / पर्सला छान चमक येते. 

Web Title: How to remove stains from clothes? Lemon is helping to remove stains from clothes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.