सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये लग्नाची, लग्नाच्या कामाची गडबड सुरू आहे. आता लग्न घरचं असो किंवा मग आपल्याला पाहूणे म्हणून कोणत्या लग्नासाठी जायचं असो. खास प्रसंगी आपण खास ठेवणीतल्या सिल्कच्या साड्या काढतो आणि अगदी जपून वापरतो. पण तरीही भरपूर काळजी घेऊनही कधीतरी सिल्कच्या साडीवर धावपळीत, गडबडीत असताना काहीतरी सांडतं आणि त्याचा डाग पडतो (How to remove stains from silk saree?). डाग पडल्यामुळे आता महागडी साडी खराब होणार म्हणून आपला जीव अगदी खालीवर होतो. पण एवढं टेन्शन घेऊ नक. कारण सिल्कच्या साडीवर पडलेले अन्नपदार्थांचे डाग काही साधे- सोपे उपाय केले तर चटकन निघून जाऊ शकतात. ते उपाय नेमके कोणते ते पाहा...(2 Home remedies to remove food item's stains from silk saree)
सिल्कच्या साडीवर पडलेले अन्नपदार्थांचे डाग कसे काढायचे?
१. निलगिरीचं तेल
एरवी आपण हाताला लावलेल्या मेहेंदीचा रंग आणखी चढावा म्हणून निलगिरीचं तेल लावतो. पण आता सिल्कच्या साडीवर पडलेले अन्नपदार्थांचे डाग काढून टाकण्यासाठी निलगिरीचं तेल वापरून पाहा.
हजार रुपयांचं फेशियल करा फक्त १० रुपयांत, बघा कसं करायचं इंस्टंट ग्लो देणारं ब्रायडल फेशियल
हा उपाय करण्यासाठी साडीवर ज्या ठिकाणी डाग पडला आहे, ती जागा थोडंसं पाणी लावून कापसाने पुसून घ्या. त्यानंतर त्या जागेवर कापसानेच निलगिरीचं तेल लावा आणि अगदी हलक्या हाताने ती जागा पुसून घ्या. डाग हळूहळू कमी होईल.
२. थंड दूध
सिल्कच्या साडीवर पडलेले अन्नपदार्थांचे डाग काढून टाकण्यासाठी थंड दूध अतिशय उपयुक्त ठरतं.
साध्या डोशाला मसाला डोसा व्हायला लागली ८०० वर्षे! आर. माधवनचं भन्नाट लॉजिक-व्हायरल पोस्ट
जिथे डाग पडला असेल त्या भागावर थंड दूध टाका. यानंतर कापसाने तो भाग अलगद पुसून घ्या. डाग निघाला नाही, तर पुन्हा थोडं दूध लावा आणि पुसून घ्या. डाग निघून गेल्यानंतर थोडं पाणी लावून तो भाग पुसून घ्या.