कधी कधी आपल्या मागे खूप धावपळ, गडबड असते. अशा घाईमध्ये मग कपड्यांवर नकळत काहीतरी सांडतं आणि त्याचा डाग पडतो. किंवा कधी अनावधानाने कपडे चुकीच्या जागी ठेवले जातात आणि त्यांच्यावर डाग पडतो. हे डाग जेव्हा महागड्या कपड्यावर आणि फिकट रंगाच्या कपड्यावर पडतात, तेव्हा ते काढून टाकणं हे एक मोठंच अवघड काम असतं. ते डाग कसे काढायचे, याचे अनेक वेगवेगळे उपाय आहेत. त्यात आता हा आणखी एक उपाय करून पाहा. डाग काढून टाकण्यासाठी बर्फाचा वापर कसा करायचा (Removing stains from the clothes using ice cubes), ते आता पाहूया...(How to remove stains from the clothes?)
कपड्यांवरचे डाग काढून टाकण्यासाठी बर्फाचा वापर
हा उपाय इन्स्टाग्रामच्या _mansi_kukreja या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
अनुष्का शर्मा तिचं फिटनेस सिक्रेट सांगते, ‘माझ्यासारखं स्लिम आणि फिट व्हायचं तर रात्रीचं जेवण...’
जर कपड्यावर चहा, कॉफीचा किंवा एखाद्या पदार्थाचा डाग नुकताच लागला असेल आणि डाग अजून पक्का झाला नसेल तर हा उपाय तुम्ही करू शकता.
सगळ्यात आधी कपड्यावर जर चहा, कॉफी किंवा एखादा पदार्थ सांडला तर तो भाग आधी पाण्याने धुवून घ्या.
त्यानंतर बर्फाचा एक तुकडा घ्या आणि तो डाग पडलेल्या ठिकाणी एखादा मिनिट घासा.
PCOS आहे, काहीही केलं तरी वजन कमीच होत नाही? आहारतज्ज्ञ सांगतात, PCOS असेल तर खास उपाय
त्यानंतर बर्फाचा एक तुकडा त्या डागांवर ५ ते ७ मिनिटे किंवा तुकडा वितळेपर्यंत ठेवून द्या.
नंतर तो कपडा उन्हात वाळवायला ठेवा. डाग निघून जाईल किंवा अगदी लक्षातही येणार नाही एवढा फिका होऊन जाईल.