Join us  

कॉलरवरील डागांमुळे व्हाईट शर्ट घालणे टाळताय? २ सोपे उपाय, मेहनत न घेता-काही मिनिटात कॉलर चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2023 3:32 PM

How to remove stains from white clothes पांढऱ्या शर्टच्या कॉलरवरील हट्टी डाग काढण्यासाठी २ सोपे उपाय

काही लोकं फॅशनेबल कपडे घालतात, तर काही सिंपल सोबर लूक ठेवतात. प्रत्येक फंक्शन किंवा ऋतूनुसार कोणते कपडे घालायचे हे ठरलेले असते. कलरफुल कपडे दोन ते तीन वेळा धुतल्यानंतरही नव्यासारखे दिसतात. लवकर खराब होत नाही. परंतु, पांढऱ्या रंगाचे कपडे धुतल्यानंतर लवकर पिवळे पडतात.

मुख्य म्हणजे पांढरा शर्ट लवकर पिवळसर होतो. घामामुळे कॉलरच्या आजूबाजूला काळे - पिवळे डाग पडतात. जे अनेक वेळा साफ करूनही डाग तसेच राहतात. घासून - घासून अनेकदा कॉलरचा कापड झिजतो. त्यामुळे महागडे डिटर्जंट आणि साबण वापरण्यापेक्षा, तीन उपायांना फॉलो करून पाहा. या उपायांमुळे कमी मेहनत घेता, कमी वेळात कॉलरवरील डाग नाहीसे होतील(How to remove stains from white clothes).

पांढरा व्हिनेगर

व्हिनेगरचा वापर आपण अनेक पदार्थात करतो. पण याचा वापर आपण पांढऱ्या रंगाच्या शर्टावरील डाग काढण्यासाठीही करू शकता. यासाठी एका भांड्यात २-३ चमचे व्हिनेगर घ्या. नंतर त्यात २ चमचे लिंबाचा रस घाला. ही तयार पेस्ट शर्टच्या कॉलरवर ५ मिनिटांसाठी लावून ठेवा. ५ मिनिटानंतर  ब्रशने कॉलर हलक्या हाताने घासा. त्यानंतर पाण्याने कॉलर स्वच्छ करा.

फक्त ५ रुपयांचा बेकिंग सोडा आणा आणि कळकट घाणेरड्या उशा करा स्वच्छ, पाहा खास उपाय

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर आपण कॉलरवरील डाग काढण्यासाठी करू शकता. यासाठी एका वाटीत २ ते ३ चमचे व्हिनेगर घ्या, त्यात २ चमचे बेकिंग सोडा घालून मिक्स करा. व ही तयार पेस्ट कॉलरवर ५ मिनिटांसाठी लावून ठेवा. ५ मिनिटानंतर हलक्या हाताने ब्रशने कॉलर घासून काढा. यामुळे कॉलरवरील पिवळट डाग निघून जातील.

झणझणीत मिरची नाकाला लावणं तरुणीला पडलं महागात! मेंदूला आली सूज - गेली कोमात

बेकिंग सोडा, व्हिनेगर व्यतिरिक्त वापरा या गोष्टी

बेकिंग सोडा, पांढरा व्हिनेगर व्यतिरिक्त आपण ब्लीच पावडर, अमोनिया पावडर आणि हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर करू शकता. यामुळे कॉलरवरील पिवळे डाग कमी होतील.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल