Join us  

पांढऱ्या शर्टवरचे डाग निघता निघत नाही? ४ उपाय, पांढऱ्या कपड्यांवरचे हट्टी डाग होतील गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 3:23 PM

How to remove stains from white clothes : पांढरा कुर्ता, शर्ट किंवा पँटवर हळदीचे डाग लागल्यास काळजी करण्याची गरज नाही, सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही डागांपासून सुटका मिळवू शकता.

पांढऱ्या किंवा कोणत्याही लाईट रंगाच्या शर्ट किंवा टिशर्टवर डाग लागला की  डाग लवकर निघणं कठीण असतं. अनेकांना लाईट रंगाचे आऊटफिट्स घालायला खूप आवडतं. पावसाळ्यात चिखलाचे, पाण्याचे डाग पडल्यानं कपडे लवकर खराब होतात.  कपड्यांवर पडलेले हे डाग वारंवार घासूनही निघत नाहीत.(How to remove stains from white clothes) हळदीचे आणि चहाचे डाग पडले असतील तर ते डाग काढणं कठीण होतं. हळदीचे डाग हट्टी असतात. पांढरा कुर्ता, शर्ट किंवा पँटवर हळदीचे डाग लागल्यास काळजी करण्याची गरज नाही, सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही डागांपासून मुक्ती मिळवू शकता. (How to Get a Stain Out of a White Shirt)

व्हिनेगर

व्हिनेगरचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो, पण त्याचा वापर कपडे स्वच्छ करण्यासाठीही करता येतो. लिक्विड साबणामध्ये व्हिनेगर मिसळा आणि हळदीचा डाग असलेल्या ठिकाणी लावा. अर्धा तासानं कपडे स्वच्छ पाण्यानं धुवा.

टूथपेस्ट

टूथपेस्टचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी केला जातो. पण खूप कमी लोकांना हे माहिती असते की, टुथपेस्टचा वापर करून तुम्ही हट्टी डागसुद्धा काढू शकता. हट्टी डाग काढण्यासाठी टूथपेस्टचा वापर केला जाऊ शकतो. डाग असलेल्या भागावर घासून नंतर थोडावेळ कोरडे राहू द्या, नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

लिंबू

अनेकदा आपण घराबाहेरचे अन्न खात असतो आणि पांढऱ्या कपड्यांवर भाजी किंवा हळदीचा डाग पडला तर ऐनवेळी डिटर्जंट शोधणे कठीण होते. अशावेळी डाग लागलेल्या भागावर लिंबू चोळा किंवा त्याचे थेंब डागावर टाका आणि नंतर पाण्याने स्वच्छ करा.

थंड पाणी

पांढऱ्या किंवा लाईट रंगाच्या कपड्यावर हळदीचा डाग असल्यास सर्वप्रथम थंड पाण्यात बुडवून डिटर्जंटमध्ये काही वेळ धुवा. थंड पाण्याच्या प्रभावामुळे अगदी कडक डाग हलके होतात. अनेकांना असे वाटते की गरम पाण्याचा डागांवर चांगला परिणाम होतो, पण थंड पाण्यामुळे कपडे लवकर स्वच्छ होतात.

ब्लीच

डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही ब्लीच वापरू शकता. यासाठी अर्धी बादली पाण्यात एक ते दोन चमचे लिक्विड ब्लीच टाकून अर्धा तास भिजत ठेवा. डाग लगेचच नाहीसे होतील.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल