Lokmat Sakhi >Social Viral > How To Remove Stains: महागड्या साडीवर पडलेले भाजी- वरणाचे डाग कसे काढाल? 7 उपाय, चिवट डागही निघतील झटपट

How To Remove Stains: महागड्या साडीवर पडलेले भाजी- वरणाचे डाग कसे काढाल? 7 उपाय, चिवट डागही निघतील झटपट

How To Remove Stains: आपल्या एखाद्या साडीवर तरी भाजी, वरण, श्रीखंड किंवा इतर आणखी कोणकोणत्या पदार्थांचा एखादा तरी डाग (stains on saree) लागलेलाच असतो.. हा डाग काढून टाकण्यासाठी करून बघा हे काही सोपे उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 05:55 PM2022-04-14T17:55:28+5:302022-04-14T17:55:48+5:30

How To Remove Stains: आपल्या एखाद्या साडीवर तरी भाजी, वरण, श्रीखंड किंवा इतर आणखी कोणकोणत्या पदार्थांचा एखादा तरी डाग (stains on saree) लागलेलाच असतो.. हा डाग काढून टाकण्यासाठी करून बघा हे काही सोपे उपाय..

How To Remove Stains: Home hacks for removing stains of food items from silk saree and other cloths | How To Remove Stains: महागड्या साडीवर पडलेले भाजी- वरणाचे डाग कसे काढाल? 7 उपाय, चिवट डागही निघतील झटपट

How To Remove Stains: महागड्या साडीवर पडलेले भाजी- वरणाचे डाग कसे काढाल? 7 उपाय, चिवट डागही निघतील झटपट

Highlightsतुमची ती डागाळलेली साडी कपाटातून बाहेर काढा आणि हे काही उपाय करून बघा.. कितीही पक्के डाग असले तरी झटकन निघून जातील. 

एखाद्या लग्नासाठी किंवा समारंभासाठी छानशी जरीकाठी साडी नेसलेली असते.. आधीच साडी म्हणजे महिलांचा विक पॉईंट आणि त्यातही ती साडी महागडी असल्याने तिच्यात जरा जास्तच जीव अडकलेला असतो.. म्हणून लग्नात कुठेही बसताना, उठताना आपण अगदी जपून वागतो.. त्यात जेव्हा जेवण करण्याची वेळ येते तेव्हा तर साडीला जपण्यासाठी आपण ताट आणि आपण स्वत: यांच्यामध्ये योग्य अंतर ठेवतो आणि प्रत्येक घास अगदी जपून खातो...

 

पण तरी व्हायचं तेच होतं.. आणि कितीही काळजी घेतली तरी आपल्याकडून किंवा दुसऱ्यांकडून आपल्या साडीवर काहीतरी सांडतं.. किंवा साडीचा पदर एखाद्या पदार्थामध्ये जाऊन मनसोक्त डुंबून येतो.. आणि मग नंतर आपल्याला त्याची जाणीव होते.. साडीला काही झालं की जीव फार हळहळतो.. कारण या महागड्या साड्या म्हणजे भलत्याच नाजूक.. त्यामुळे त्यांच्यावर पडलेला डाग हा तळहाताच्या फोडासारखा झेलावा लागतो... शिवाय डाग काढायला गेलाे आणि साडीचा तेवढा भागच खराब झाला तर अशी भीतीही वाटतेच की.. म्हणूनच तर आता तुमची ती डागाळलेली (Home hacks for removing stains on saree) साडी कपाटातून बाहेर काढा आणि हे काही उपाय करून बघा.. कितीही पक्के डाग असले तरी झटकन निघून जातील. 

 

महागड्या साड्यांवर पडलेले डाग काढून टाकण्यासाठी...
१. सिल्कच्या साडीवर चहाचे किंवा एखाद्या पदार्थाचे डाग पडले असतील तर तो डाग ओला असतातच थोडंसं पाणी लावून स्वच्छ करा. त्यानंतर त्या जागेवर ग्लिसरीन लावून ठेवा. ४ ते ५ तासांनंतर थंड पाण्याने तेवढी जागा धुवून टाका. 
२. सिल्कच्या साडीवर डाग पडल्यास त्यावर काही काळ व्हाईट व्हिनेगर किंवा लिंबू लावून ठेवा. त्यानंतर थंड पाणी आणि कापुस यांच्या मदतीने डाग स्वच्छ करा.
३. कपड्यांवर नेलपेंटचा डाग लागला असल्यास रॉकेल किंवा नेलपेंट रिमुव्हरने तो काढता येतो.
४. कपड्यांवरचे डाग काढून टाकण्यासाठी निलगिरी तेलही उपयुक्त ठरते.


५. थंड दुधाच्या मदतीनेही कपड्यांवरचे डाग काढून टाकता येतात. यासाठी डागाळलेला भाग थंड दुधात बुडवून ठेवा. त्यानंतर त्या भागावर कापसाने पाणी लावा. त्यावर थोडेसे मीठ चोळा पुन्हा कापसाने पाणी लावून ती जागा स्वच्छ करा. डाग निघून जातील.
६. कपड्यावर खाद्यपदार्थांचे डाग पडले असल्यास त्यावर काही वेळ टुथपेस्ट लावून ठेवा. २ ते ३ तासांनी अंगाची साबण लावून तो भाग स्वच्छ करून घ्या. 
७. तेल किंवा शाईचे डाग पडले असतील तर त्या जागेवर टाल्कम पावडर काही काळ लावून ठेवा. त्यानंतर थंड पाणी आणि कापुस यांच्या मदतीने डाग स्वच्छ करा.


 

Web Title: How To Remove Stains: Home hacks for removing stains of food items from silk saree and other cloths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.