लहान मुलं कधी मातीत खेळतात तर कधी रंगात. बरेचदा खाताना पदार्थ त्यांच्या कपड्यांवर सांडतात तर कधी आणखी काही. या सगळ्यामुळे मुलांचे कपडे खूप खराब सतत होतात. कपड्यांवरचे डाग निघाले नाहीत तर ते कपडे तसेच घालता येत नाहीत. डाग पडलेले कपडे मशीनला टाकले तरी ते निघत नाहीत. मग ते हाताना घासावे लागतात, मग आपण साबण लावून ब्रशने कपडे घासत राहतो. पण त्यामुळे कपड्यांचा रंग, डिझाईन निघून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे कपडे जास्त घासूनही चालत नाहीत. अशावेळी मुलांच्या कपड्यांवरचे हट्टी डाग काढण्यासाठी वापरता येईल अशी सोपी ट्रिक पाहूया (How To Remove Stains on Cloths Cleaning Tips).
यामुळे कपडे छान स्वच्छ होतील आणि डाग निघून गेल्याने कपडे पडून न राहता ते वापरताही येतील. लहान मुलेच काय पण मोठ्यांच्या कपड्यांवरही अनेकदा वेगवेगळे डाग पडतात. बराच प्रयत्न करुनही डाग निघत नसतील तर हे कपडे टाकून देण्याशिवाय पर्याय राहत नाही. पण हे कपडे महाग असतील तर मात्र चांगले कपडे केवळ डाग पडले या कारणास्तव टाकून देणे आपल्या जीवावर येते. इन्स्टाग्रामवर नेहमी विविध प्रकारच्या स्वच्छतेच्या टिप्स कोणी ना कोणी शेअर करत असते. आताही प्रिती भुतरा यांनी Mom Musings bypriti या अकाऊंटवरुन अशाच सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत.
१. एका बाऊलमध्ये चमचाभर बेकींग सोडा घ्या.
२. त्यामध्ये चमचाभर लिंबाचा रस घाला .
३. भांडे धुण्याचा लिक्विड सोप घाला.
४. एक चमचा व्हाईट व्हिनेगर टाका.
५. यामध्ये थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करा.
६. खराब झालेल्या टूथब्रश या मिश्रणात बुडवून त्याने डाग पडलेल्या ठिकाणी घासा.
७. वेगवेगळ्या प्रकारचे डाग निघून जाण्यास याची चांगली मदत होईल.
८. त्यामुळे ही झटपट सोपी ट्रीक कपड्यांवरचे डाग जाण्यासाठी नक्की ट्राय करा.