Join us  

पांढऱ्याशुभ्र कपड्यांवर रंगाचे डाग पडले? फक्त २ पदार्थ लावा, डाग गायब होतील... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2024 11:48 AM

How To Remove Stains On White Clothes: पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर पडलेले रंगांचे डाग काढून टाकण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा...(simple hacks to clean white clothes)

ठळक मुद्देहा उपाय एवढा सोपा आहे की तो केल्यानंतर पांढरे कपडे घालण्याचं आणि त्यावर डाग पडण्याचं टेन्शन तुम्हाला कधीच येणार नाही.

पांढरे कपडे अंगात घातले की एक वेगळाच आकर्षक लूक येतो. इतर रंग कितीही आकर्षक, सुंदर असले तरी पांढऱ्या रंगातल्या कपड्यांची जी छाप समोरच्यावर पडते, त्याची सर इतर रंगांना नाही. खरंतर पांढरे कपडे सांभाळणं कठीण जातं, पण तरीही आपण कधी कधी असे स्वच्छ पांढरे, चमकदार मोतिया रंगाचे कपडे घेतोच. पांढरे कपडे अंगात घातले की आपण अगदी हळूच, जपून कामं करतो. पण तरी व्हायचा तो गोंधळ होतोच आणि पांढऱ्या कपड्यांवर नेमका डाग पडतो (tips and tricks to remove oily stains on white clothes). आता हा डाग कसा घालवायचा याचा एक अगदी सोपा उपाय पाहा (how to remove stains on white clothes?).. हा उपाय एवढा सोपा आहे की तो केल्यानंतर पांढरे कपडे घालण्याचं आणि त्यावर डाग पडण्याचं टेन्शन तुम्हाला कधीच येणार नाही. (simple hacks to clean white clothes )

पांढऱ्या कपड्यांवर पडलेले डाग कसे काढायचे?

 

पांढऱ्या कपड्यांवर पडलेले इतर रंगांचे डाग कसे काढायचे याविषयीचा एक सोपा उपाय virtualdiva.officialया इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

पावसाळ्यात आजारपण टाळण्यासाठी किचनमधल्या ५ गोष्टींची काळजी घ्या, बघा स्मार्ट किचन टिप्स

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला इनो आणि लिंबू एवढे दाेन पदार्थ प्रामुख्याने लागणार आहेत.

सगळ्यात आधी तर एका भांड्यामध्ये एकदम कडक पाणी घ्या. जर तुमच्या कपड्यांना पडलेला डाग खूप जास्त गडद आणि मोठा असेल तर कडक पाण्यामध्ये इनोचे ४ पाकिटं टाका. डागाचे आकारमान पाहून तुम्ही इनोच्या पाकिटांची संख्या कमी जास्त करू शकता.

 

यानंतर त्याच गरम पाण्यात आता २ लिंबांचा रस टाका. आता हे सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि त्या मिश्रणात तुमचा डाग पडलेला कपडा ३ ते ४ तासांसाठी भिजत ठेवा.

मुलांची हाडं होतील दणकट आणि शरीर पोलादी, फक्त ५ सवयी लावा, मुलं होतील सुदृढ, सशक्त

३- ४ तास कपडा भिजल्यानंतर तो कपडा पुन्हा एकदा चांगल्या पाण्यात टाका आणि डाग जिथे पडले होते, ती जागा हाताने रगडून स्वच्छ करा. जर तुमच्या कपड्यांना ब्रशने घासलेलं चालणार असेल तर ब्रश वापरा. यानंतर पुन्हा एकदा कपडा पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्या. रंगांचे डाग गायब झालेले दिसतील. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल