Lokmat Sakhi >Social Viral > नव्याकोऱ्या भांड्यांवरचे कागदी स्टिकर कसे काढायचे? शेफ पंकज भदौरीया सांगतात १ सोपी युक्ती...

नव्याकोऱ्या भांड्यांवरचे कागदी स्टिकर कसे काढायचे? शेफ पंकज भदौरीया सांगतात १ सोपी युक्ती...

how to remove sticker labels from utensils : नव्या भांड्यांवरचे स्टिकर काढणं अवघड काम, कधी ते अर्धवटच निघतात अशावेळी काय करायचं पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2024 04:21 PM2024-07-29T16:21:39+5:302024-07-29T16:34:48+5:30

how to remove sticker labels from utensils : नव्या भांड्यांवरचे स्टिकर काढणं अवघड काम, कधी ते अर्धवटच निघतात अशावेळी काय करायचं पाहा..

how to remove sticker labels from utensils How to Remove Stickers & Gum from New utensils in 1 minute | नव्याकोऱ्या भांड्यांवरचे कागदी स्टिकर कसे काढायचे? शेफ पंकज भदौरीया सांगतात १ सोपी युक्ती...

नव्याकोऱ्या भांड्यांवरचे कागदी स्टिकर कसे काढायचे? शेफ पंकज भदौरीया सांगतात १ सोपी युक्ती...

किचनमध्ये रोजच्या वापरात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची भांडी वापरावी लागतात. विशेष म्हणजे कोणत्याही गृहिणीच्या किचनमध्ये कितीही भांडी असली तरीही ती त्यांना कमीच वाटतात. याचबरोबर काही नवीन भांड्यांचे प्रकार आले की प्रत्येक गृहिणीला ती भांडी हवीच असतात. त्यामुळे प्रत्येक एक ते दोन महिन्यांत घरात नवीन भांड येतच असत. कोणतंही नवीन भांड घेतलं की त्यावर चिटकवलेले स्टिकर्स काढणे हे सगळ्यात किचकट आणि कंटाळवाणे काम असते(how to remove sticker labels from utensils).

जेव्हा आपण नवीन भांडी खरेदी करतो, तेव्हा बऱ्याच भांड्यांवर कंपनीच्या नावाचे स्टिकर्स असतात. बऱ्याचवेळा ही भांडी कितीही वेळा घासली तरी ते स्टिकर्स निघतं नाही. असे स्टिकर्स काढून टाकण्याच्या प्रयत्नात अनेकवेळा भांड्यावर ओरखडे देखील पडतात. परंतु असे स्टिकर्स सहजासहजी निघत नाहीत आणि जरी निघाले तरीही त्या स्टिकर्सचा चिकटपण जाताजात नाही. भांड्यांवरचे स्टिकर काढण्यासाठी मास्टरशेफ (Pankaj Bhadouria)पंकज भदौरिया (Pankaj Ke Nuskhe: How to Remove Stickers from Utensils Easily) यांनी एक सोपी ट्रिक सांगितली आहे. या ट्रिकचा वापर करुन आपण अगदी सहजपणे भांड्यांवरचे स्टिकर्स काढू शकता. भांड्यांवरील स्टिकर्स काढण्यासाठी खाली दिलेल्या टिप्स नक्कीच वापरून पाहा( How to Remove Stickers & Gum from New utensils in 1 minute).

नवीन भांड्यांवरचे स्टिकर्स काढण्यासाठी... 

१. नवीन भांड्यांवरचे स्टिकर्स काढण्यासाठी पंकज भदौरिया सांगतात, सर्वातआधी भांड्यांवर ज्या भागावर स्टिकर लावला आहे तो भाग गॅसच्या मंद आचेवर हलकासा गरम करावा. हा भाग हलकासा गरम केल्याने भांड्यांवरचे स्टिकर्स अगदी सहजपणे निघू शकतात. स्टिकर्स निघाल्यानंतर त्या भागांवर स्टिकर्सचा चिकटपणा राहतो. असा चिकटपणा काढण्यासाठी त्या भागावर चिमुटभर मीठ आणि १ टेबलस्पून तेल घालून हलकेच घासून घ्यावे. या टिप्सचा वापर केल्याने नवीन भांड्यांवरचे स्टिकर्स अगदी सहजपणे निघून त्याचा चिकटपणा देखील काढला जातो. 

२. नवीन भांड्यांवरील स्टिकर्स निघत नसतील तर अशा भांड्यात गरम पाणी ओतावे. गरम पाण्यात थोडासा लिक्विड सोपं घालून या द्रावणात हे नवीन भांडे १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवावे. १५ ते २० मिनिटांनंतर या भांड्यावरील स्टिकर्स अगदी सहजपणे काढून टाकता येतो. 

रंग- स्केचपेन-मार्करने मुलांनी घराच्या भिंती रंगवल्या? पाहा भिंतींवरचे डाग काढण्याची १ भन्नाट ट्रिक...

३. नेलपेंट रिमुव्हरचा वापर करुन देखील आपण नवीन भांड्यांवरील स्टिकर्स काढू शकता. यासाठी एका कापसाच्या बोळ्यावर नेलपेंट रिमुव्हर घेऊन ते स्टिकर्सवर अलगद लावून हलकेच घासून घ्यावे. त्यानंतर १० ते १५ मिनिटे हे नेलपेंट रिमुव्हर स्टिकरवर तसेच राहू द्यावे. या टिप्सचा वापर केल्याने नवीन भांड्यांवरील स्टिकर्स अगदी सहजपणे निघून जातील. 

४. १ टेबलस्पून डिटर्जंट पावडर घेऊन त्यावर थोडेसे पाणी घालून ती किंचित ओली करुन घ्यावी. ही ओली डिटर्जंट पावडर स्टिकर्सवर लावून घासणीने स्टिकर्सवर हलकेच घासून घ्यावे. यामुळे स्टिकर निघण्यास मदत होईल.

नवीन कपडे पहिल्यांदा धुताना रंग जातो? पाण्यात मिसळा ३ पदार्थ, रंग जाणार नाही...


 

Web Title: how to remove sticker labels from utensils How to Remove Stickers & Gum from New utensils in 1 minute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.