घर स्वच्छ ठेवण्यासाठी झाडू हवाच. झाडूशिवाय घराची स्वच्छता पूर्ण होऊ शकत नाही. झाडू ही अशी वस्तू आहे, जी एकदा घेतल्यास वर्षभर आरामात वापरता येते. मात्र, रोजच्या वापरामुळे झाडांची पानं व काड्या तुटून पडतात. अशा वेळी आपण नवीन झाडू आणतो. नवीन झाडूमधून प्रचंड भुसा निघतो. झाडू मारताना तो भुसा घरभर पसरतो. हा भुसा काढण्यासाठी २ उपाय करून पाहा.
या ३ घरगुती ट्रिकमुळे काही मिनिटात नव्या झाडूतून भुसा निघेल. शिवाय पुन्हा केर काढताना भुसा घरभर पसरणार नाही(How to remove the bhoosa [chaff] from the phool jhadu ).
नव्या झाडूतून भुसा काढण्याची सोपी ट्रिक
व्यायाम-डाएट करूनही वजन कमी होईना? जेवण करण्याची पाहा योग्य पद्धत; वेट लॉस की गॅरण्टी
पहिली ट्रिक
- नव्या झाडूतून भुसा काढण्यासाठी प्रथम, घराबाहेर किंवा गच्चीवर न्या.
- यानंतर, वरच्या बाजूने झाडूला दोरीने बांधा.
- आता ते छतावर, भिंतीवर किंवा जमिनीवर हळूवारपणे वारंवार मारा.
- असे केल्याने झाडूमधून भुसा सहज निघून जाईल. आणि मग घरातला केर काढताना कोणतीही अडचण येणार नाही.
दुसरी ट्रिक
- झाडूतून भुसा काढण्यासाठी आपण कंगवा किंवा वॉशिंग ब्रशचा वापर करू शकता.
- यासाठी एक कंगवा घ्या. कंगवा मोठ्या दातांचा असेल याची खात्री करा. ज्याप्रमाणे आपण केस विंचरतो, त्याच प्रमाणे केर काढण्याची बाजू विंचरून घ्या. असे करत असताना झाडू गोल - गोल फिरवत जा.
- जेणेकरून संपूर्ण बाजूने भुसा निघेल. आपण मोठ्या दातांचा कंगवा वापरण्याऐवजी कपडे धुण्याचा ब्रश देखील घेऊ शकता. या ट्रिकमुळे भुसा काही मिनिटात निघून जाईल.
तिसरी ट्रिक
- नवीन झाडू आणल्यानंतर दाराबाहेर झाडून घ्या. जेणेकरून त्यातील भुसा निघेल.
किलोभर लसूण सोलण्याची युनिक ट्रिक! फक्त अर्धा चमचा बेकिंग सोड्याचा वापर कसा करावा, पाहा..
- एका मोठ्या बादलीत पाणी भरून घ्या. त्या पाण्यात झाडू तीन ते चार वेळा धुवून भिजत ठेवा.
- पाण्यामुळे झाडूतील भुसा निघून जाईल. व झाडू स्वच्छ होईल. ओला झालेला झाडू उन्हात वाळवत ठेवा. सुकल्यानंतर आपण झाडू वापरू शकता. या ट्रिकमुळे झाडूमधून भुसा निघून जाईल.