Lokmat Sakhi >Social Viral > पांढरे डाग पडल्याने नळ, शॉवर खूपच भुरकट दिसतात? १ सोपा उपाय करा, नव्यासारखी चमक येईल 

पांढरे डाग पडल्याने नळ, शॉवर खूपच भुरकट दिसतात? १ सोपा उपाय करा, नव्यासारखी चमक येईल 

How To Remove Hard Water Stains From Tap And Shower?: बाथरुम, सिंक, बेसिन याठिकाणचे स्टीलचे नळ स्वच्छ करण्याची ही बघा १ सोपी युक्ती.. अगदी नव्यासारखी चमक येईल. (Cleaning tips for stainless steel tap and shower)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2023 12:52 PM2023-12-12T12:52:03+5:302023-12-12T12:53:01+5:30

How To Remove Hard Water Stains From Tap And Shower?: बाथरुम, सिंक, बेसिन याठिकाणचे स्टीलचे नळ स्वच्छ करण्याची ही बघा १ सोपी युक्ती.. अगदी नव्यासारखी चमक येईल. (Cleaning tips for stainless steel tap and shower)

How to remove white stains on taps and shower in bathroom, How to remove hard water stains from tap? Cleaning tips for stainless steel tap and shower | पांढरे डाग पडल्याने नळ, शॉवर खूपच भुरकट दिसतात? १ सोपा उपाय करा, नव्यासारखी चमक येईल 

पांढरे डाग पडल्याने नळ, शॉवर खूपच भुरकट दिसतात? १ सोपा उपाय करा, नव्यासारखी चमक येईल 

Highlightsनळ- शॉवर किंवा बाथरुममधले स्टीलचे पाईप यांच्यावर जर पाण्याचे भुरकट डाग पडले असतील तर ते काढून टाकण्याचा सोपा उपाय....

हल्ली बहुतांश घरांमध्ये बोअरवेलचे पाणी असते. या पाण्यात क्षारांचे प्रमाण खूप जास्त असल्याने घरातले, बाथरुममधले नळ लगेच भुरकट पडतात. त्यांच्यावरचा हा भुरकटपणा लवकर काढला नाही तर ते नळ नंतर काळपट दिसू लागतात. असे पांढरट, काळपट डाग पडलेले नळ, शॉवर काही दिवसांनी खूपच अस्वच्छ होतात. हे डाग एकदा पक्के झाले की मग आपण नेहमीप्रमाणे साबण आणि घासणीने हे नळ स्वच्छ केले तरी ते डाग काही जात नाहीत (How to remove white stains on taps and shower in bathroom). म्हणूनच असे पक्के झालेले डाग काढून टाकण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा (How to remove hard water stains from tap?). नळांवरचे सगळे डाग निघून जातील आणि त्यांना अगदी नव्यासारखी चमक येईल.(Cleaning tips for stainless steel tap and shower)

 

नळ, शॉवर यांच्यावरचे डाग काढून टाकण्यासाठी उपाय

नळ- शॉवर किंवा बाथरुममधले स्टीलचे पाईप यांच्यावर जर पाण्याचे भुरकट डाग पडले असतील तर ते काढून टाकण्याचा सोपा उपाय natalia.be.be या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला व्हाईट व्हिनेगर, डिशवॉश लिक्विड आणि अल्कोहोल वापरायचे आहे. अल्कोहोल नसेल तरी चालेल.

स्वयंपाक करायचाय पण कोथिंबीर, आलं, कढीपत्ता नाही? बघा १ सिक्रेट उपाय, स्वयंपाकाला येईल न्यारीच चव...

सगळ्यात आधी तर एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी, व्हाईट व्हिनेगर आणि डिशवॉश लिक्विड हे सगळे एकत्र करून घ्या. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून नळावर, शाॅवरवर फवारा.

त्यानंतर साधारण ५ ते ७ मिनिटे ते तसेच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ ओलसर कपड्याने नळ पुसून घ्या. डाग निघून गेलेले असतील. डाग निघाले नाही तर आणखी एकदा हा प्रयोग करा.

 

हा उपायही करून पाहा

दात स्वच्छ करण्यासाठी उपयोगी ठरणारी टुथपेस्ट नळावरचे डाग काढून टाकण्यासाठीही खूप मदत करते.

छोट्या कुंडीतही भरपूर फुलून येणारी ७ रोपं, बघा कमी जागेत भरपूर झाडं लावण्याचा खास उपाय..

यासाठी व्हाईट व्हिनेगर आणि टुथपेस्ट एकत्र करा आणि एखाद्या ब्रशच्या किंवा घासणीच्या मदतीने ते नळावर लावा. यानंतर ५ ते ६ मिनिटांनी थोडे पाणी शिंपडून नळ घासून घ्या. नळ- शॉवर यांच्यावरचे डाग निघून जातील. 

 

 

Web Title: How to remove white stains on taps and shower in bathroom, How to remove hard water stains from tap? Cleaning tips for stainless steel tap and shower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.