भारतीय घरांमध्ये २ प्रकारचे टॉयलेट असतात, एक भारतीय आणि दुसरे वेस्टर्न. ज्याच्या त्याच्या सोयीने घरात टॉयलेट बसवले जातात. परंतु, टॉयलेट साफ करण्याची पद्धत बहुतांश जणांची सारखीच आहे (Cleaning Tips). टॉयलेट साफ करण्यासाठी टॉयलेट क्लीनर, ब्रश, शिवाय बाजारात मिळणाऱ्या इतर क्लीनरचा वापर केला जातो. पण क्लीनरमुळे टॉयलेट साफ होईलच असे नाही.
खरंतर टॉयलेट नियमित साफ करायला हवे (Toilet Clean). पण अधिक काळ टॉयलेट साफ न केल्यामुळे पिवळट डाग आणि घाण सहसा निघत नाही. शिवाय हे हट्टी डाग काढणं कठीण होऊन जातं. जर टॉयलेट क्लीनर आणि ब्रशने घासूनही स्वच्छ होत नसेल तर, आईसक्युब्सचा वापर करून पाहा. पण बर्फाच्या तुकड्यांचा वापर करून टॉयलेट साफ कसे होईल? पाहा(How to REMOVE YELLOW STAINS from Toilet Seat!).
टॉयलेट क्लिन करण्यासाठी बर्फाच्या तुकड्यांचा वापर कसा करावा?
लागणारं साहित्य
अर्धा किलो बर्फ
डिटर्जंट पावडर
बाथरूम क्लीनर
कॉस्टिक सोडा
दृष्टी सुधारते-कोलेस्टेरॉल कमी करते! रोज खा काळे मनुके; आरोग्य सुधारेल-हाडंही मजबूत होतील..
मीठ
गरम पाणी
ब्रश
अशा पद्धतीने बर्फाच्या तुकड्यांचा वापर करून साफ करा टॉयलेट
टॉयलेट पॉट करण्यासाठी आधी पाण्याने स्वच्छ करा. नंतर बर्फाचे तुकडे घाला. आता बर्फावर बाथरुम क्लीनर घाला आणि ब्रशच्या मदतीने क्लिनर बर्फात मिसळा.
मेहनत घेऊनही वजन घटत नाही? सकाळी ४ गोष्टी महिनाभर करा; पोट - मांड्या सगळंच कमी होईल
४ ते ५ मिनिटानंतर त्यात ५ चमचे डिटर्जंट पावडर घाला. नंतर कॉस्टिक सोडा आणि चार ते पाच चमचे मी घालून ब्रशने बर्फात मिक्स करा.
आता २ मिनीटानंतर ब्रशच्या मदतीने टॉयलेट स्वच्छ घासून काढा. निदान ५ मिनिटांसाठी टॉयलेट पॉट ब्रशने घासा. त्यानंतर मिनिटांसाठी तसेच सोडा.
५ मिनिटानंतर पुन्हा टॉयलेट पोट आणि टाईल्स ब्रशचे घासून फ्लश करा. शेवटी टॉयलेटमध्ये कोमट पाणी ओतून क्लिन करा. यामुळे टॉयलेट पोट सहस क्लिन होईल, शिवाय हट्टी पिवळट डाग काही मिनिटात साफ होईल.