Join us  

टॉयलेट सीट पिवळी-अस्वच्छ दिसते? ३ सोपे उपाय, स्वच्छ-पांढरीशुभ्र दिसेल टॉयलेट सीट-इन्फेक्शनही टळेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2024 10:16 AM

How to remove yellow stains from Toilet Seat : remove yellow toilet seat stains in seconds : कमोड तर आपण स्वच्छ करतो परंतु टॉयलेट सीटच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून या टिप्स...

बाथरुम मधील कमोड हा नेहमीच वापरला जातो. कमोड रोजच्या वापराने खराब होतो. कमोड सोबतच टॉयलेट सीट देखील तितकीच वापरली जाते. टॉयलेट सीटचा रोज वापर होत असल्याने टॉयलेट सीट देखील सततच्या वापराने खराब होते. घरात जर जास्त माणसं असतील तर टॉयलेट सिटही वारंवार वापरल्याने लवकर घाण होते. परंतु टॉयलेट सीट कितीहीवेळा स्वच्छ केली तरीही ती खूप लगेच खराब होते. काहीजणांना टॉयलेट सीट साफ करायला आवडत नाही(How do you remove yellow stains from the toilet seat).

टॉयलेट सीट साफ करणे म्हणजे काहींना किळसवाणे किंवा घाणेरडे काम वाटते. टॉयलेट सीट साफ करणे हा काही लोकांना मोठा टास्कच असतो. असे लोक टॉयलेट सीट साफ करताना तोंड आणि नाक झाकून त्याकडे लक्ष न देता दोन - तीन वेळा ब्रश फिरवून या कामातून सुटका करून घेतात. जर टॉयलेट सीटचा रोज वापर होत असेल तर तीची स्वच्छता (remove yellow toilet seat stains in seconds) करणे देखील तितकेच महत्वाचे असते. टॉयलेट सीट साफ करण्यासाठी आपण काही सोप्या ट्रिक्सचा वापर करुन अगदी कमी वेळात टॉयलेट सीट स्वच्छ करु शकतो. या सोप्या ट्रिक्सचा वापर केल्याने टॉयलेट सीट चमकदार करण्यासाठी जास्त मेहेनत करावी लागणार नाही(How to remove yellow stains from Toilet Seat).

टॉयलेट सीट स्वच्छ करण्याच्या सोप्या ट्रिक्स... 

१. बेकिंग पावडर :- घाणेरड्या टॉयलेट सीटवरील काळे - पिवळे डाग काढून टाकण्यासाठी आणि टॉयलेट सीट चमकण्यासाठी तुम्ही बेकिंग पावडरचा  वापर करु शकता. अर्धा कप पाण्यात ४ चमचे बेकिंग पावडर मिसळून पेस्ट बनवावी. आता ही पेस्ट टॉयलेट सीटवर ब्रशच्या मदतीने पसरवा आणि १५ ते २० मिनिटे तशीच ठेवून द्यावे. शेवटी, ब्रशच्या मदतीने टॉयलेट सीट घासून स्वच्छ करावे आणि पाण्याने टॉयलेट सीट स्वच्छ धुवून घ्यावी. 

कुकरच्या झाकणाला पडलेले पिवळे चिकट तेलकट डाग काढण्याचे २ सोपे उपाय, झाकण होईल नव्यासारखे चकचकीत... 

२. ग्लिसरीन आणि व्हिनेगर :- ग्लिसरीन आणि व्हिनेगरचा वापर करुन आपण फारशी मेहेनत न घेता टॉयलेट सीट स्वच्छ करु शकता. एक कप ग्लिसरीनमध्ये  व्हिनेगर मिसळा आणि त्यात थोडा लिंबाचा रस घाला. हे द्रावण स्प्रे बाटलीत भरल्यानंतर ते टॉयलेट सीटवर शिंपडा. ब्रशने घासल्याने टॉयलेट सीटवरील डाग निघून जातील आणि बॅक्टेरियाचा धोका कमी होण्यास मदत मिळेल. 

३. बोरॅक्स पावडर आणि लिंबू :- टॉयलेट सीट व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी आपण बोरॅक्स पावडर आणि लिंबाच्या रसाचीही मदत घेऊ शकता. ३ ते ४ चमचे बोरॅक्स पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळून टॉयलेट सीटवर लावा. आता अर्धा तास हे असेच राहू द्या, मग ब्रशच्या मदतीने टॉयलेट सीट स्वच्छ करा. यामुळे टॉयलेट सीट नव्यासारखे चमकेल.

कमोड स्वच्छ ठेवण्यासाठी महागडे फ्रेशनर- क्लिनर्स आणता? १ सोपा घरगुती उपाय, इन्फेक्शनही राहील दूर...

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स