चहा- कॉफीचे कप प्रत्येक घरात अगदी डझनावारी असतात. कारण चहा हे आपलं राष्ट्रीय पेय... त्यामुळे प्रत्येक घरांत किमान २ वेळा तरी चहा होतोच होतो. ज्या घरांमध्ये चहा होत नाही तिथे कॉफी हमखास केली जातेच. म्हणजेच काय तर चहा किंवा कॉफी होते आणि त्यासाठी नेहमीच कप लागतात. बऱ्याचदा हे कप गडबडीत विसळले जातात. म्हणून मग त्यांच्यावर वापरून वापरून पिवळट डाग (Yellowish Stains On The Tea Cups) दिसू लागतात. हे डाग हळूहळू पक्के होतात. घासल्यावर निघत नाहीत. म्हणून मग असे पिवळट झालेले कप चांगले असले तरी टाकून देतो. (Remedies To Clean Coffee Mug or tea cup)
पण आता असे पिवळट कप टाकून देऊ नका. त्याऐवजी कप स्वच्छ करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागणार आहे हे नक्की.
फ्लॉवरपॉटमध्ये ठेवलेली फुलं सुकू नयेत म्हणून ४ उपाय, आठवडाभर फुलं राहतील फ्रेश
पण त्यामुळे नविन कप घेण्याचे पैसे मात्र तुम्ही निश्चितच वाचवू शकता. त्यासाठी आपल्याला बेकिंग सोडा, व्हिनेगर किंवा लिंबाचा रस आणि डिशवॉश अशा सर्वसाधारणपणे कोणत्याही घरात आढळून येणारेच पदार्थ लागणार आहेत. या पदार्थांच्या मदतीने पिवळट झालेले कप कसे स्वच्छ करायचे ते आता पाहूया...
पिवळट झालेले कप कसे स्वच्छ करायचे?
सगळ्यात आधी तर एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घ्या. त्यात तुमच्या घरातलं कोणतंही डिशवॉश लिक्विड टाका आणि थोडा बेकिंग सोडा टाका. आता या पाण्यात अर्धा ते एक तास पिवळट झालेले सगळे कप भिजत टाका.
गरब्यासाठी जाताना २ मिनिटांत करा केस काळे, बघा ३ स्प्रे- डाय न करता केस होतील क्षणात काळेभोर
त्यानंतर बेकिंग सोड्यामध्ये पाणी घालून त्याची घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट कपावर लावा आणि घासणीने कप घासून काढा.
ओवा ‘असा’ खा, झटपट होईल वजन कमी!
त्यानंतर एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात साधारण ५ ते ६ लीटर पाणी असेल तर त्यात एक कप व्हिनेगर टाका. या पाण्यात आता घासलेले कप अर्धा तास भिजत टाका. त्यानंतर हे कप घासून काढा आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. कप अगदी नव्यासारचे चमकतील.