घरात बरेच दरवाजे असतात पण टॉयलेट, बाथरूमचे (Bathroom Door) दरवाजे सगळ्यात आधी खराब होतात. दरवाजे कितीही चांगले असतील तरीही ते लवकर खराब होतात. याचं सगळ्यात मोठं कारण पाणी ठरतं. (Cleaning Hacks) पाणी लागल्यामुळे लाकडाचे दरवाजे फुलू लागतात आणि नंतर सडायला सुरूवात होते. बाथरूमचे दरवाजे जास्त दिवस चांगले रहावेत यासाठी तुम्ही सोप्या ट्रिक्स फॉलो करू शकता. (How to Repair Bathroom Damage Door)
रबर सिलिंग स्ट्रिपचा वापर करा
बाजारात लाकडाचे दरवाजे खराब होऊ नयेत यासाठी बरेच साहित्य उपलब्ध असते. त्यातीलच एक म्हणजे रबर सिलिंग स्ट्रिप आहे. याचा वापर करून तुम्ही दरवाजे दीर्घकाळ चांगले ठेवू शकता.
दरवाज्यावर स्टिलची कटिंग लावा
लाकडाच्या दरवाज्याला सुरक्षित ठेवण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे टिन. जर तुमच्याकडे टिन किंवा गरम पाण्याची कटींग असेल तर तुम्ही लाकडी दरवाज्याला दोन्ही बाजूंनी लावू शकता. ज्यामुळे दरवाजा दीर्घकाळ चांगला राहील.
एल्यूमिनियम दरवाज्यांचा वापर करा
बाथरूममध्ये लागलेला दरवाजा सतत बदलूनही वारंवार खराब होत असेल तर हा दरवाजा तुम्ही बदलायला हवा. एल्यूमिनियमचा दरवाजा लावून घ्या. एल्यूमिनियमचा दरवाजा स्वस्त आणि वॉटरप्रूफ असतो.
200 किलो वजनाच्या कोरोओग्राफरनं ९८ किलो घटवलं; डाएटमध्ये 'हे' ५ बदल करून मेंटेन केलंं
तुंग तेलाचा वापर करा
लाकडाच्या दरवाज्याला पाणी लागू नये यासाठी तुंग तेलाचा वापर करा. तुंग ऑईल वॉटर रेजिस्ंटस प्रमाणे काम करते. या तेलामुळे तेल दरवाज्याच्या फटीत जाण्यापासून रोखता येते. डोअर फिनिशिंगसाठीसुद्धा तुम्ही या तेलाचा वापर करू शकता.
प्लास्टीकचे दरवाजे
बाथरूमचे दरवाजे खराब होण्याची भिती असेल तर तुम्ही प्लास्टीकचे दरवाजे न वापरता लाकडाच्या दरवाज्यांचा वापर करू शकता. ५ ते १० महिन्यांच्या अंतराने बाथरूमच्या कड्यांना व्यवस्थित वर्निश करा. असं केल्यानं दरवाज्यात जास्त पाण्याचे मॉईश्चर राहणार नाही.
कंबर दुखते, अशक्तपणा येतो? व्हिटामीन बी-१२ देणारे ५ पदार्थ खा; तरतरी येईल-हाडं होतील बळकट
बाथरूमचा लाकडी दरवाजा सतत खराब होत असेल किंवा खालच्या बाजूने सडत असेल तर तुम्ही प्लास्टीक पेंटचा वापर करू शकता. आजकाल बाजारात बरेच प्लास्टींक पेंट उपलब्ध आहेत. ज्याच्या वापराने तुम्ही दरवाजे पेंट करू शकता. ज्यामुळे खाली दरवाजे खराब होत नाहीत.