Lokmat Sakhi >Social Viral > गॅस शेगडीची फ्लेम मंद झाली? ५ सोपे उपाय, मेकॅनिकला न बोलावता वाढेल बर्नरची फ्लेम

गॅस शेगडीची फ्लेम मंद झाली? ५ सोपे उपाय, मेकॅनिकला न बोलावता वाढेल बर्नरची फ्लेम

How To Repair Gas Stove Low Flame | Kitchen Hacks : गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली असेल तर, गॅस वाया जातो, शिवाय सिलेंडरही लवकर संपतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2024 02:56 PM2024-01-29T14:56:06+5:302024-01-29T14:57:58+5:30

How To Repair Gas Stove Low Flame | Kitchen Hacks : गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली असेल तर, गॅस वाया जातो, शिवाय सिलेंडरही लवकर संपतो..

How To Repair Gas Stove Low Flame | Kitchen Hacks | गॅस शेगडीची फ्लेम मंद झाली? ५ सोपे उपाय, मेकॅनिकला न बोलावता वाढेल बर्नरची फ्लेम

गॅस शेगडीची फ्लेम मंद झाली? ५ सोपे उपाय, मेकॅनिकला न बोलावता वाढेल बर्नरची फ्लेम

धावपळीच्या या जीवनात प्रत्येकाचे वेळापत्रक ठरलेलं (Kitchen Hacks) आहे. जर यात काही गडबड झाली तर, पुढील कामात बाधा निर्माण होते. आपल्यापैकी प्रत्येक जणींची सुरुवात किचनमधून होते. कामाच्या ऐन गडबडीत जर बर्नरची फ्लेम कमी झाली तर, खूप वैताग येतो. स्वयंपाक करण्याचा वेळ कमी होऊन जातो. शिवाय वेळेवर पदार्थ शिजतही नाही. बर्नरमधून कमी फ्लेम येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. गॅस शेगडीची कमी झालेली फ्लेम पुन्हा पहिल्यासारखी करण्यासाठी आपण गॅस शेगडी रिपेअर करणाऱ्या मेकॅनिकला बोलावतो (Gas Burner).

यात वेळ तर वाया जातोच, शिवाय खर्चही भरपूर होतो (Kitchen Tips and Tricks). पण आपण घरच्या घरी देखील बर्नर रिपेअर करू शकता. बर्नरची फ्लेम कमी झाली असेल तर, कोणत्या गोष्टी तपासायला हव्या? पाहा(How To Repair Gas Stove Low Flame | Kitchen Hacks).

बर्नरमधून कमी फ्लेम येत असेल तर..

- बऱ्याचदा कामाच्या व्यापामुळे आपण फक्त शेगडी साफ करतो. बर्नर साफ करण्याचे राहून जाते. त्यामुळे बर्नर स्वच्छ करून घ्या. बर्नरच्या छिद्रांमध्ये घाण अडकते. ज्यामुळे बर्नरची फ्लेम कमी होते. त्यामुळे काही घरगुती साहित्यांचा वापर करून बर्नर स्वच्छ करून घ्या.

- आपण गॅस बर्नर मीठ आणि लिंबाच्या वापराने स्वच्छ करू शकता. यासाठी लिंबू कापून त्यांना मीठ लावून बर्नरवर घासा, आणि नंतर बर्नर स्वच्छ धुवून घ्या. या ट्रिकमुळे बर्नर व्यवस्थित स्वच्छ होईल.

अफेअर्स-लग्न-घटस्फोट आणि मुलाची कस्टडी, बिग बॉसचा हिरो ठरलेल्या मुनव्वरच्या आयुष्याची चित्तरकथाच..

- गॅस वाल्वच्या बिघाडामुळे गॅस फ्लेमची समस्या निर्माण होते. जर गॅस फ्लेम कमी किंवा व्यवस्थित पेटत नसेल तर, एकदा गॅस वाल्व तपासून घ्या.

- जर आपल्या सिलेंडरचा गॅस रेग्युलेटर खराब झाला असेल तर, तपासून घ्या. यामुळे गॅसची फ्लेम कमी होऊ शकते.

जय हिंद! देशाला लाभली पहिली महिला सुभेदार, सैन्यात मिळाली बढती..देशाच्या लेकीची जिद्द अशी की..

- बऱ्याचदा गॅस आणि सिलेंडरमध्ये झालेल्या मिस कनेक्शनमुळेही गॅसची फ्लेम मंद होऊ शकते. त्यामुळे दिवसातून एकदा गॅस कनेक्शन तपासा.

- गॅस सिलेंडरचा पाईप तपासून घ्या. गॅस सिलेंडरचा पाईप दीर्घकाळ वापरल्याने तो जुना होतो. ज्यामुळे स्फोट होण्याचा धोका देखील नाकारता येत नाही. पाईप दीर्घकाळ न बदलल्याने फ्लेम मंद होते. बरीच वर्ष झाली असतील तर पाईप बदलून घ्या.

Web Title: How To Repair Gas Stove Low Flame | Kitchen Hacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.