किचनमध्ये आपण रोजचा स्वयंपाक करताना वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरतो. या अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर केल्याशिवाय पदार्थाला हवी तशी चव येत नाही. पदार्थांची चव वाढवण्यासाठी तसेच ते अधिक रुचकर आणि स्वादिष्ट लागण्यासाठी त्यात आपण आवर्जून मसाले घालतो. हे मसाले आपण बाजारांतून विकत आणले की ते बरणीत भरुन स्टोअर करुन ठेवतो. काहीवेळा काही मसाले हे दररोज लागणारे असलयाने आपण ते पटकन हाताशी लागतील अशा जागेवर ठेवतो. याचसोबत काही मसाले हे दीर्घकाळ टिकणारे नसल्याने आपण त्यांना खूप काळजीपूर्वक फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतो(How to seal plastic bags with hair straightener).
बहुतेकवेळा आपण फ्रिजमध्ये एका कोपऱ्यात अनेक प्रकारच्या मसाल्यांची पाकीट एकदा उघडून, वापरुन तशीच ठेवून देतो. ही मसाल्यांची पाकीट किंवा छोटे बॉक्स तसेच उघडून ठेवले तर काही दिवसांनी या मसाल्यांचा स्वाद उतरतो. याचबरोबर काहीवेळा ही पाकीट अशीच उघडी ठेवून दिल्याने हे मसाले फ्रिजमध्ये सांडून फ्रिज खराब होऊ शकतो. यासाठीच आपण एक साधीसोपी ट्रिक वापरून एकदा उघडलेले हे मसाल्यांचे पाकीट किंवा बॉक्स परत आहेत तसेच छान पॅकिंग करून ठेवू शकतो. मसाल्यांची ही एकदा उघडलेली पाकीट सील करून ठेवण्यासाठी आपल्या स्टॅप्लर पीन किंवा रबर बँड यांची गरजही लागणार नाही यासाठी नेमके काय करायचे ते पाहुयात(How to Re - Seal any Bags With Hair Straightener).
१. मसाल्याची एकदा उघडलेली पाकिटे पुन्हा सील करण्याची भन्नाट ट्रिक...
१. मसाल्यांची एकदा उघडलेली पाकिटे पुन्हा सील करून ठेवणे म्हणजे फारअवघड काम. ही मसाल्यांची पाकिटे जर दीर्घकाळ अशीच उघडी राहिली तर ओलाव्याने किंवा पावसाळ्यात दमट वातावरणामुळे मसाले खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी आपण ही पाकीट सील करण्यासाठी केस स्ट्रेट करण्याच्या हेअर स्ट्रेटनर टूलचा वापर करु शकतो. हेअर स्ट्रेटनर घेऊन ते आधी थोडे गरम करून घ्यावे. त्यानंतर मसाल्यांचे पाकिट जिथे उघडले आहे तो भाग स्ट्रेटनर मध्ये ठेवून स्ट्रेटनर दोन्ही बाजुंनी दाबून १० ते १५ सेकंदांसाठी तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर आपण बघू शकता की हे मसाल्याचे पाकीट पूर्ण सील झाले असेल.
घरातील डस्टबीनमधून येते कुबट दुर्गंधी? ५ सोपे उपाय, डस्टबीन वारंवार स्वच्छ करण्याची गरजच नाही...
२. मसाल्यांचे बॉक्स पॅकिंग करण्याची सोपी ट्रिक...
मसाल्याचे बॉक्स वापरुन झाल्यानंतर असे एकदा उघडलेली मसाल्यांचे बॉक्स पॅकिंग करण्यासाठी एक सोपी ट्रिक आपण वापरु शकतो. यासाठी मसाल्यांचे बॉक्स उघडे असताना त्याच्या वरच्या दिशेने असणारे बाजूचे दोन पुठ्ठयांचे भाग कापून घ्यावेत. त्यानंतर बॉक्सचा जो आडवा मोठा भाग असतो तो एका बाजूचा भाग आतल्या बाजूला फोल्ड करा. त्यानंतर संपूर्ण बॉक्सच्या दोन्ही बाजूच्या बाहेरच्या कडा आतल्या बाजूला फोल्ड करा. त्यानंतर वरचा दुसरा जो आडवा मोठा भाग आहे तो बॉक्सच्या आतल्या बाजूला फोल्ड करा. (व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे) अशाप्रकारे आपण या दोन सोप्या ट्रिक्स वापरून एकदा उघडलेले मसाल्यांचे पाकीट आणि बॉक्स पुन्हा हवे तसे सील करून स्टोअर करून ठेवू शकतो. यामुळे मसाल्यांचे पाकीट आणि बॉक्स दीर्घकाळ उघडे न राहिल्याने त्यातील मसाल्यांचा स्वाद कायम टिकून राहण्यास मदत मिळेल.