Join us  

काय मग लाडू कधी देणार? असा प्रश्न सतत विचारुन छळणाऱ्या नातेवाईकांना काय उत्तर द्याल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2024 6:29 PM

How To Respond Relatives When they Keep Asking About Your Marriage : नातेवाईक सतत प्रश्न विचारतात की लग्न कधी करणार? आईवडिलांना बोलतात, त्याप्रसंगी काय करावे?

मुलगी-मुलगा वयात आले की अवतीभोवतीच्या लोकांचा एकच प्रश्न, आता लाडू कधी देणार? नातेवाईत जवळचेच असतात ते सतत विचारतात. आईवडिलांचं प्रेशर वाढवतात. प्रश्न तेच 'लग्न कधी करणार?' 'लग्नाचं वय झालंय, कधी उडवायचा बार?' 'लग्नासाठी आम्ही मुलगा/मुलगी शोधू का?' असे प्रश्न हमखास विचारले जातात. लग्न ही अत्यंत खासगी प्रश्न असल्याने असं ट्रोलिंग मुलामुलींना आवडत नाही. पण करणार काय? नेमकं काय करावं अशावेळी?

अनेकदा लग्न लवकर जमत नाही. वय वाढत जातं, मनासारखा जोडीदारही मिळत नाही. काहींना करिअर करायचं असतं, नोकरीत सेटल व्हायचं असतं, काही महत्त्वाकांक्षा असतात. आणि दुसरीकडे लग्नाचा रेटा. इतरांच्या घरात लग्न ठरलं की आईवडील अधिक काळजीत पडतात. आपल्या घरी कधी तोरण लागणार असं त्यांना होतं. बाकीच्यांचं काही नाही पण आईवडिलांची काळजी पाहून मुलं हैराण होतात. प्रश्न एवढाच की सतत छळणाऱ्या नातेवाईकांना काय उत्तर द्यायचं?(How To Respond Relatives When they Keep Asking About Your Marriage).

१. दुर्लक्ष करा

बरेच नातेवाईक शालीतून टोमणे मारतात त्यांच्या बोलण्याकडे शक्य तितके दुर्लक्ष करणे. प्रत्येक वेळी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ नका. जर तुमचा फोकस करिअरकडे असेल तर, त्याकडेच ठेवा. खुलासे देऊ नका.

वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना लक्षात ठेवा ५ टिप्स, कपडे निघतील स्वच्छ-विजेचे बिलही येईल कमी

२. आपली भूमिका प्रेमाने मांडा

लग्न करायचं की नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे कुणी काही म्हंटले तर भांडू नका. जवळचे नातेवाईक-घरच्यांना प्रेमाने सांगा. भांडू नका. उलट उत्तरं देऊ नका. अपमानास्पद बोलू नका.

स्वयंपाकाला फार तेल लागतं? ५ टिप्स- कमी तेलात भाज्या होतील चमचमीत, वडे-पुऱ्याही फुगतील टम्म

३. समजावूनही ऐकत नसतील तर..

असेही काही नातेवाईक असतात, जे समजावूनही ऐकत नाहीत. ते सतत एकच प्रश्न विचारून हैराण करतात. त्यांना एकदाच स्पष्ट शब्दात पण नम्रपणे सांगा की तुम्ही माझ्या भानगडीत पडू नका. आपला निर्णय आपणच आदराने इतरांना सांगितला तर वाद होत नाहीत.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप