उन्हाळा (Summer Special) सुरु झाल्यानंतर उकाडा वाढतो. ज्यामुळे आपण इतर फॅब्रिकचे कपडे टाळून फक्त कॉटनचे कपडे घालतो. सुती कपडे केवळ घाम शोषत नाही तर, शरीर देखील थंड राखण्यात मदत करते. बरेच जण कॉटन कपड्यांचा वापर करतात. पण सुती कापडांची एक समस्या आहे. ती म्हणजे कॉटनचे कपडे धुतल्यानंतर रंग सोडते. अनेकदा कॉटन कपड्यांचा रंग लवकर फिका पडतो. ज्यामुळे नवे कपडेही जुने दिसू लागतात (Washing Tips).
जर आपल्याला कॉटन कपड्यांचा रंग कायम तसाच ठेवायचं असेल, शिवाय कॉटनचे कपडे कशा पद्धती धुवायचे हे जाणून घ्यायचं असेल तर, तुरटीचा सोपा उपाय करून पाहा (Cotton Clothes). तुरटीच्या उपायामुळे कॉटनच्या कपड्यातून रंग निघणार नाही. शिवाय कायम नव्यासारखे दिसतील(How to Restore Faded Clothes : Easy Alum Tip to wash Clothes).
कॉटन कपड्यांचा रंग कायम ठेवण्यासाठी तुरटीचा वापर
- कॉटन कपड्यांचा रंग फिका पडू नये म्हणून आपण तुरटीचा वापर करू शकता. यासाठी एका खलबत्त्यात तुरटीचा तुकडा घ्या. त्याला ठेचून त्याची पावडर तयार करा.
उन्हाळा सुरु होताच डास सळो की पळो करतात? ५ घरगुती गोष्टी; डास घरात फिरकणार नाहीत
- एका बादलीमध्ये पाणी भरून घ्या. त्यात तुरटीची पावडर घालून मिक्स करा. त्यात सुती कपडे घाला आणि ३० मिनिटांसाठी भिजत ठेवा.
- ३० मिनिटानंतर आपण ज्यापद्धतीने कपडे धुतो, त्याप्रमाणे कपडे धुवून घ्या. जर आपण नवीन सुती कापड आणलं असेल तर, अशा पद्धतीने कपडे धुवून घ्या. मगच याचा वापर करा.
'शैतान' फेम ज्योतिकाचं साधं सोपं फिटनेस सिक्रेट; तिचे वय किती? विश्वास नाही बसणार..
- कपडे धुवून झाल्यानंतर सूर्यप्रकाशात वाळत घालण्यापेक्षा घरातच सुकत घाला. सूर्यप्रकाशात वाळत घातल्याने कॉटन कपड्यांचा रंग फिका पडू शकतो.