Lokmat Sakhi >Social Viral > तुटलेलं क्लचर लगेच फेकून देता? २ पद्धतींनी वापरा, पाहा भन्नाट उपयोग-तुटकी वस्तूही कामाची

तुटलेलं क्लचर लगेच फेकून देता? २ पद्धतींनी वापरा, पाहा भन्नाट उपयोग-तुटकी वस्तूही कामाची

Home Hacks: तुटलेलं क्लचर लगेच फेकून देत असाल तर आधी २ पद्धतींनी त्याचा वापर करून पाहा.. बघा तुटलेली ही लहान वस्तूसुद्धा किती वेगवेगळ्या प्रकारे वापरता येते...(how to reuse broken cluture or hair clip?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2024 02:19 PM2024-10-07T14:19:02+5:302024-10-07T19:07:14+5:30

Home Hacks: तुटलेलं क्लचर लगेच फेकून देत असाल तर आधी २ पद्धतींनी त्याचा वापर करून पाहा.. बघा तुटलेली ही लहान वस्तूसुद्धा किती वेगवेगळ्या प्रकारे वापरता येते...(how to reuse broken cluture or hair clip?)

how to reuse broken cluture, best home hacks to reuse old broken cluture or hair clip | तुटलेलं क्लचर लगेच फेकून देता? २ पद्धतींनी वापरा, पाहा भन्नाट उपयोग-तुटकी वस्तूही कामाची

तुटलेलं क्लचर लगेच फेकून देता? २ पद्धतींनी वापरा, पाहा भन्नाट उपयोग-तुटकी वस्तूही कामाची

Highlightsतुटलेलं क्लचर टाकून देण्यापेक्षा त्याचा किती वेगवेगळ्या पद्धतीने वापर करता येतो ते पाहा.

हल्ली बहुतांशजणी केस बांधण्यासाठी क्लचर वापरतात. रबरबँण्डपेक्षाही क्लचर लावून जास्त स्टायलिश पद्धतीने केस बांधता येतात. त्यामुळे रबराच्या ऐवजी क्लचर वापरणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले आहे. क्लचरमध्येही अगदी लहान आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंत कित्येक वेगवेगळे प्रकार मिळतात. काही दिवस वापर केल्यानंतर कल्चरचे स्क्रू सैल हाेतात आणि तुटतात. असं तुटलेलं क्लचर आपण अगदी सहजगत्या टाकून देतो (best home hacks to reuse old broken cluture). पण ते टाकून देण्यापेक्षा त्याचा किती वेगवेगळ्या पद्धतीने वापर करता येतो ते पाहा.. (how to reuse broken cluture?)

 

तुटलेलं कल्चर पुन्हा वापरात आणण्याची मस्त ट्रिक

तुटलेलं क्लचर कशा पद्धतीने पुन्हा वापरात आणता येईल याविषयी माहिती सांगणारा एक मस्त व्हिडिओ 2414garima या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

नवरात्रीमध्ये कुंकूमार्चन करायचं? घरीच तयार करा कोणतीही भेसळ नसणारं शुद्ध कुंकू, डागही पडणार नाही

त्यामध्ये सांगण्यात आलेल्या पहिल्या उपयोगानुसार तुटलेलं क्लचर तुम्ही टंग क्लिनर अडकविण्यासाठी वापरू शकता.

तुटलेल्या क्लचरचा वेगवेगळ्या प्रकारचे गळ्यातले, रबरबॅण्ड अडकविण्यासाठीही खूप चांगला उपयोग होऊ शकतो. तो उपयोग नेमका कसा करायचा ते पाहा..


 

तुटलेलं क्लचर कसं वापरावं?

तुटलेल्या क्लचरचा जो भाग चांगला आहे, कुठेही तुटलेला नाही, त्या भागाला मागच्या बाजुने डबलटेप लावा आणि ते तुमच्या बेसिनच्या आरशाजवळ किंवा तिथे असणाऱ्या कपाटाच्या आतल्या बाजुने चिटकवून टाका. 

हनुवटीखालची, गळ्यावरची चरबी वाढल्याने चेहरा जाड दिसतो? डबल चीन कमी करण्यासाठी ५ सोपे व्यायाम

आजा क्लचरचे जे छोटे छोटे आकडे असतात, त्या आकड्यांमध्ये तुम्ही तुमचे छोटे- छोटे रबर बँड किंवा गळ्यातले अडकवून ठेवू शकता. यामुळे गळ्यातले एकमेकांमध्ये अडकतही नाहीत आणि ते चटकन उचलून लगेच घालण्यासाठी अगदी हाताशी असतात. 

तुटक्या क्लचरचा कधी तरी असा वापर करून पाहायला हरकत नाही. क्लचरचा भाग दिसणार नाही, अशा पद्धतीने तुम्ही त्यावर एखादं कृत्रिम फुल किंवा छोटंसं शो बटन लावलं, तर ते नक्कीच आणखी आकर्षक दिसेल. 

Web Title: how to reuse broken cluture, best home hacks to reuse old broken cluture or hair clip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.