संक्रांतीच्या दिवशी सुगड्याचे म्हणजेच मातीच्या लहान लहान आकाराच्या बोळक्यांचे पूजन करण्याची परंपरा अनेक घरांमध्ये असते. संक्रांतीच्या दिवशी आणि त्याच्यानंतर काही दिवस या सुगड्यांना खूप महत्त्व असते. पण त्यानंतर मात्र पौष महिना संपला की सुगडे घरात इकडे- तिकडे कुठेतरी कोपऱ्यात ठेवून दिले जातात. किंवा मग घरात लहान मुली असतील तर ती ते सुगडे खेळायला घेतात (How to reuse sankrant sugadi?). आता हे सुगडे असे कुठेतरी ठेवून देण्यापेक्षा त्यांचा छानसा उपयोग कसा करायचा ते पाहूया...(Amazing reuse ideas for sankranti or pongal pot or sugadi)
संक्रांतीच्या सुगड्यांचा पुनर्वापर करण्याच्या ट्रिक्स
१. मातीच्या भांड्यात लावलेले दही अतिशय चांगले लागते, घट्ट होते. या सुगड्यांचा उपयोग दही लावण्यासाठी करू शकता. फक्त दही लावण्याआधी सुगडे चांगले धुवून घ्या. काही वेळ पाण्यात भिजत ठेवा. जेव्हा त्यांचा रंग जाणे बंद होईल, तेव्हाच त्याचा वापर दही लावण्यासाठी करा.
फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा फ्रुट फेशियल, टॅनिंग कमी होऊन त्वचा दिसेल उजळ- चमकदार
२. तंदूरी चहा करण्यासाठी अशा पद्धतीच्या मातीच्या बोळक्यांचाच उपयोग होतो. त्यामुळे कधी तरी मूड झाल्यावर घरच्याघरी तंदूरी चहा करून पिण्यासाठी सुगड्यांचा खूप चांगला वापर होऊ शकतो.
३. सुगड्यांना खालच्या बाजुला खिळ्याने एखादं छोटंसं छिद्र पाडलं तर मनी प्लांट किंवा इतर कोणतंही छोटंसं झाड लावण्यासाठी सुगड्यांचा वापर करू शकता.
आयरा खान म्हणते नुपूरने प्रपोज केल्यावर पहिल्यांदा त्याला ठामपणे 'नाही' सांगितलं होतं, कारण......
४. सुगड्यांना छान रंग दिला तर घरात किंवा टेरेसमध्ये, बागेत डेकोरेशन पीस म्हणून सुगडी ठेवू शकता.
५. सुगड्यांना स्वच्छ करून त्यांना छान रंग देऊन घ्या आणि पाहूणे आल्यानंतर चटणी, सॉस, ठेचा असे पदार्थ देण्यासाठी सर्व्हिंग बाऊल म्हणून ते वापरा. एकदम वेगळं आणि भारी वाटेल.