उन्हाळ्याची चाहूल लागली की आपोआपच आपल्या शहरात माठविक्रेते मोठ्या संख्येने येऊ लागतात आणि मग एखादी प्रथा किंवा परंपरा असल्यासारखी आपली पावलंही नकळतपणे माठ खरेदीसाठी वळू लागतात. पण खरंतर असं दरवर्षी वेगळा, नवा माठ घेण्याची गरज नसते. जर तुमचा मागच्यावर्षीचा माठ फुटला असेल, खराब झाला असेल तर नक्की नवा माठ खरेदी करा. पण घरात जुना माठ असताना नवा माठ घेण्याची काहीच गरज नाही. तो जुनाच माठ जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरला तर त्यातही अगदी नव्या माठासारखे थंडगार पाणी होऊ शकते आणि तुमचे बरेचसे पैसे वाचू शकतात (how to reuse old matka or math to get cool water?). त्यासाठी जुना माठ वापरात आणण्यापुर्वी नेमके काय उपाय करायचे ते पाहूया..(best trick to reuse old matka or clay pot for getting chilled water)
जुन्या माठात पाणी थंड व्हावे म्हणून काय उपाय करावे?
जुन्या माठातले पाणी थंड व्हावे यासाठी काय उपाय करता येऊ शकतो, याविषयीची माहिती 'आपली आजी' या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आली आहे.
लहान मुलांचे गुडघे, हाताचे कोपरे खूप काळवंडले? १ साेपा उपाय- १० मिनिटांत टॅनिंग गायब
यामध्ये असं सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही जुना माठ वापरायला काढाल तेव्हा तो एकदा पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या आणि घासणीने आतून, बाहेरून घासून पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय केल्याने माठाची छिद्रे मोकळी होऊन पाणी थंड होण्यास मदत होईल.
त्यानंतर आता एक वाटी मीठ घेऊन माठामध्ये टाका. त्यामध्ये १ ग्लास पाणी घाला आणि हे मिठाचं पाणी माठाच्या आतल्या भागात सगळीकडून लागेल अशा पद्धतीने माठ फिरवा. आता ३ ते ४ तास मीठाचं पाणी माठात अशाच पद्धतीने राहू द्या.
Women's Day 2025: तुमच्या आयुष्यातल्या स्पेशल महिलांना द्या ५ प्रकारचं गिफ्ट- मनापासून आनंदी होतील
त्यानंतर पुन्हा एकदा माठ आतून- बाहेरून स्वच्छ धुवून घ्या. आता माठापेक्षाही आकाराने मोठे असणारे एखादे भांडे घ्या. त्या भांड्यात पाणी भरा आणि त्या पाण्यामध्ये माठ ८ ते १० तास बुडवून ठेवा. यानंतर पुन्हा एकदा माठ धुवून घ्या. आता हा माठ पाणी भरून ठेवण्यासाठी योग्य झाला आहे.
माठामध्ये पाणी भरून ठेवल्यानंतर त्यावर एक ओलसर कपडा गुंडाळावा. पाणी अगदी थंडगार होईल. नवा माठ घेण्याची गरजही वाटणार नाही.