Lokmat Sakhi >Social Viral > दारासमोर काढलेली रांगोळी फेकू नका, ‘असा’ करा वापर- स्वयंपाकघरातली कळकट भांडीही होतील चकाचक

दारासमोर काढलेली रांगोळी फेकू नका, ‘असा’ करा वापर- स्वयंपाकघरातली कळकट भांडीही होतील चकाचक

How To Reuse Rangoli: दारासमोर काढलेली रांगोळी दुसऱ्यादिवशी कचऱ्यात टाकून देण्यापेक्षा २ खास पद्धतींनी तिचा वापर करून पाहा.(what to do if rangoli colours get mixed?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2024 01:12 PM2024-11-11T13:12:35+5:302024-11-11T13:28:10+5:30

How To Reuse Rangoli: दारासमोर काढलेली रांगोळी दुसऱ्यादिवशी कचऱ्यात टाकून देण्यापेक्षा २ खास पद्धतींनी तिचा वापर करून पाहा.(what to do if rangoli colours get mixed?)

how to reuse rangoli, what to do if rangoli colours get mixed? best reuse of rangoli again | दारासमोर काढलेली रांगोळी फेकू नका, ‘असा’ करा वापर- स्वयंपाकघरातली कळकट भांडीही होतील चकाचक

दारासमोर काढलेली रांगोळी फेकू नका, ‘असा’ करा वापर- स्वयंपाकघरातली कळकट भांडीही होतील चकाचक

Highlightsपांढऱ्या रांगोळीमध्ये थोडी टुथपेस्ट टाका आणि त्या मिश्रणाने चांदीची भांडी स्वच्छ करा.

दसरा, दिवाळी या सणांच्या निमित्ताने आपण दारासमोर खूप हौशीने मोठी रांगोळी काढतो. काही जणींची रांगोळी एवढी मोठी असते की तिच्यासाठी अगदी किलोभर किंवा त्यापेक्षाही जास्त रांगोळी वापरली जाते. पण एकदा काढलेली रांगोळी काही तासांतच खराब होते. शिवाय दररोज दारासमोर नव्याने रांगाेळी काढावी, अशी आपली प्रथा. त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी इच्छा नसतानाही आपण ती मोडतो. एवढी जास्त रांगोळी कचऱ्यात टाकून देणं खरंतर जिवावर येतं (what to do if rangoli colours get mixed?). म्हणूनच आता या रांगोळीचा पुन्हा कसा वापर करता येऊ शकतो, ते पाहूया..(best reuse of rangoli again)

दारासमोर काढलेल्या रांगोळीचा पुन्हा वापर कसा करावा?

 

१. स्टीलची भांडी स्वच्छ करण्यासाठी

तुम्ही दारासमोर कितीही वेगवेगळे रंग वापरून रांगोळी काढली असेल तरीही ती स्वयंपाक घरातली भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता.

सफरचंद चिरल्यानंतर काळं पडतं म्हणून मुलांना डब्यात देणं टाळता? २ उपाय- सफरचंद राहील फ्रेश

बऱ्याचदा स्वयंपाक करताना भाज्या करपतात आणि कढई बुडाला काळपट होते. कढईचा असा जळकटपणा काढून टाकण्यासाठी रांगोळी उपयुक्त ठरते. रांगोळीमध्ये थोडं डिशवॉश लिक्विड टाका आणि मग तारेच्या घासणीने कढई घासा. कमी मेहनतीत चकाचक होईल.

 

२. तांब्याची, पितळेची भांडी घासण्यासाठी

तांब्याची किंवा पितळेची भांडी घासण्यासाठी रांगोळीमध्ये लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ घाला आणि त्या मिश्रणाने तांब्याची किंवा पितळेची भांडी घासा. इतर कोणत्याही उपायापेक्षा या उपायाने भांडी अगदी लख्खं चमकतील.

भाजी खारट झाली तर घाबरु नका; करा 'हे' उपाय- मीठ जास्त पडल्याचं लक्षातही येणार नाही

३. चांदीची भांडी घासण्यासाठी

रांगोळीचा वापर करून चांदीची भांडीही खूप स्वच्छ घासता येतात. पण त्यासाठी रंगबेरंगी रांगाेळी वापरू नका. चांदीच्या भांड्यांसाठी पांढरी रांगोळीच वापरा. पांढऱ्या रांगोळीमध्ये थोडी टुथपेस्ट टाका आणि त्या मिश्रणाने चांदीची भांडी स्वच्छ करा.

 

४. फरशीवरचा तेलकटपणा काढून टाकण्यासाठी

कधीकधी फरशीवर तेल सांडतं किंवा मग किचन ओटा, गॅस शेगडीच्या मागच्या टाईल्स खूप चिकट, तेलकट होतात. या टाईल्स स्वच्छ करण्यासाठीही रांगोळीचा खूप चांगला वापर करता येतो. रांगोळीमध्ये लिंबाचा रस, बेकिंग सोडा आणि डिशवॉश लिक्विड टाकून टाईल्स घासून काढा. अगदी स्वच्छ होतील. 

 

Web Title: how to reuse rangoli, what to do if rangoli colours get mixed? best reuse of rangoli again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.