सध्या गॅस खूप महाग झाला आहे. त्यात पावसाळ्याचे आणि थंडीचे दिवस म्हटले की नेहमीपेक्षा जरा जास्तच गॅस लागतो. काही काही कुटूंबांमध्ये तर अगदी महिन्याला एक गॅस सिलेंडर लागते. त्यामुळे दर महिन्याला गॅस सिलेंडरपायी एवढे पैसे मोजायला कठीण होतं. कधी कधी महिन्याचं आर्थिक बजेट कोलमडून जातं. म्हणूनच गॅस सिलेंडरची बचत हे काही साधे सोपे उपाय करून पाहा (how to save cooking gas?)... हा उपाय केल्याने महिनाभर चालणारं गॅस सिलेंडर नक्कीच ८- १० दिवस जास्त चालेल. ते नेमकं कसं ते पाहा... (home remedies and tricks for long lasting LPG gas cylinder)
गॅस सिलेंडर अधिक दिवस चालण्याचा उपाय
गॅस सिलेंडर जास्त दिवस चालण्यासाठी नेमका काय उपाय करावा, याविषयीचा एक व्हिडिओ taste.thee.best या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
धोतर नेसलेला रितेश देशमुख आणि नऊवारीतली जेनेलिया! बघा अंबानींकडच्या लग्नात देशमुखांचा मराठी थाट
हा उपाय करण्यासाठी गॅस बर्नर काढून एका भांड्यात घ्या. त्या बर्नरच्या वरच्या बाजुने एखादी टुथपेस्ट लावून ठेवा. आता त्यावर थोडं व्हिनेगर टाका आणि इनोचे एक पॅकेट टाका.
आता थोडं गरम पाणी घ्या आणि त्या बर्नरवर टाका. बर्नर पुर्णपणे बुडेल एवढं पाणी टाकावं. यानंतर आता त्या भांड्यावर १० ते १५ मिनिटांसाठी झाकण ठेवून द्या.
खोबरेल तेलात फक्त २ पदार्थ टाकून डोक्याला मालिश करा, पातळ केस होतील दाट- काळेभोर
यानंतर एखाद्या खराब टुथपेस्टच्या मदतीने बर्नर घासून घ्या. हा उपाय केल्यामुळे बर्नरच्या छिद्रांमध्ये अडकलेला कचरा पुर्णपणे निघून जाईल आणि बर्नर अगदी स्वच्छ होईल. असं स्वच्छ चकाचक झालेलं बर्नर वापरल्यास तुमचा गॅस नेहमीपेक्षा निश्चितच जास्त दिवस चालेल, असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.