Join us  

दिवाळीत कंदील, लाईटींगमुळे वीजबील जास्त येतं? ५ टिप्स, बील एकदम कमी येईल, खर्च वाचेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 1:39 PM

How to Save Electricity Bill : लाईटबील जास्त येण्यामुळे तुम्हालाही चिंता वाटत असेल तर काळजी करण्याचं काहीही कारण नाही छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देऊन विजेचं बील कमी करू शकता.

घरात टिव्ही, फ्रिज व्यतिरिक्त अनेक उपकरणं असतात जसंकी वॉशिंग मशिन, मायक्रेव्हेव्ह, ओव्हन आणि एअरफ्रायर, टोस्टर असते. दिवाळीच्या दिवसांत सर्वांच्याच घरात रोशणाई असते. ( Electricity Saving Tips)  कंदील, लायटींगमुळे बील जास्त येतं. लाईटबील जास्त येण्यामुळे तुम्हालाही चिंता वाटत असेल तर काळजी करण्याचं काहीही कारण नाही छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देऊन विजेचं बील कमी करू शकता. (How To Save Electricity  How To Reduce Light Bill) 

जुन्या उपकरणांमुळे विजेचे बील जास्त येते. बाजारात सध्या एनर्जी एफिशिएंट ५ स्टार रेटींगचे अप्लायंस दिसू लागले आहेत ज्यामुळे विजेची बचत होते. जेव्हाही तुम्ही कामासाठी बाहेर पडता तेव्हा लाईट आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं  बंद करायला विसरू नका.  फोन चार्जर किंवा लॅपटॉप, टिव्हीचं स्विच बटन या वस्तूंचा वापर  नसेल तर बटण आठवणीनं  बंद करा. कारण तासनतास  ही उपकरणं सुरू राहिल्यामुळे लाईटबील वाढतं. म्हणून वापरानंतर स्विच बंद करायला विसरू नका.

एईडी बल्ब  ट्रेडिशनल बल्बच्या तुलनेत अधिक वीज वाचवतात. यामुळे विजेचे  बील कमी होते आणि हे बल्ब दीर्घकाळ चालतात. कंप्यूटरवर काम करून झाल्यानंतर पॉवर स्विच ऑफ करा. याव्यतिरिक्त मोबाईल चार्जर गरज नसतान सुरू ठेवू नका. यामुळे विज जास्त लागू शकते. याशिवाय टिव्ही स्टँडबाय मोडवर ठेवू नका. जेव्हा तुम्हाला एसीची आवश्यकता असेल तेव्हा   एसी २४ डिग्रीवर  चालवा आणि खोली थंड झाल्यानंतर बंद करा.

चांगल्या कुलिंगसाठी एसी असलेल्या खोलीत कमीत कमी फर्नीचर ठेवा.  जास्त सामान किंवा फर्निचरमुळे हवेत बाधा येते. फर्नीचर कमी केल्यानं टेम्परेचर नियंत्रणात राहतं आणि रूमही गार राहते. ज्यामुळे विजबील जास्त येत नाही. रात्रीच्यावेळी घरातील सर्व  लाईट्स बंद ठेवा. वॉटर हिटरचे तामपान कमी ठेवा.

गरम पाण्यानं अंघोळ करायची असेल तर कमी तापमानात हिटर सुरू ठेवा. यामुळे तापमान जास्त वाढणार नाही. जर तुम्ही घराच्या छतावर पंखा लावत असाल  तर रेग्युलेटर लावायला विसरू नका. तरीसुद्धा  विजबील कमी होत नसेल  तर त्वरीत वीज महावितरण केंद्रात अर्ज भरून तक्रार दाखल करा.

टॅग्स :दिवाळी 2024