जवळपास प्रत्येक घरात एलपीजी गॅसचा (LPG Gas) वापर केला जातो. पारंपारीक चुल्ह्यांप्रमाणे या गॅसवर स्वंयपाक करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. वेळ आणि मेहनत दोन्हींची बचत होते. म्हणूनच छोट्या गावांमध्येही याचा भरपूर वापर केला जातो. ( 5 Ways You Can Save LPG While Cooking) गॅस सिलेंडरच्या मदतीनं स्वयंपाक करणं खूपच सोपं झालं आहे. अनेक घरांमध्ये सिलेंडर महिनाभरसुद्धा व्यवस्थित चालत नाही. अशा स्थितीत तुम्ही गॅस बचतीच्या काही टिप्स वापरून खर्च कमी करू शकता. हा उपाय परिणामकारक ठरतो. (How To Save Gas While Cooking At Home)
सुपर गॅसच्या रिपोर्टनुसार जेव्हा तुम्ही उच्च आचेवर स्वंयपाक करता तेव्हा जास्त गॅस वायाच जातो. जेव्हा तुम्ही कमी गॅसवर अन्न शिजवता तेव्हा २५ टक्के गॅसची बचत होते. आधी भिजवून नंतर शिजवले जाणारे पदार्थ जसं की कडधान्य, तांदूळ, सोयाबीन, डाळी यामुळे इंधन वाचतं. याशिवाय पदार्थ शिजवण्यासाठी भिजवून ठेवणं तब्येतीसाठी उत्तम असते. कोणताही पदार्थ शिजवताना गरजेपेक्षा जास्त पाणी घालू नका. कारण पाणी आटवण्यात बराच गॅस वाया जातो अनेकदा अन्नही जास्त शिजते. लहान गॅस बर्नरला ६ ते १० टक्के इंधन लागतं तुलनेने मोठ्या बर्नरर्सना जास्त गॅस लागतो.
ओली भांडी गॅसवर ठेवू नका
अनेकदा घाईघाईत स्वंयपाक करताना लोक ओली भांडी लोक स्टोव्हवर ठेवतात. उष्णतेमुळे भांडे पूर्णपणे सुकते. पण या पूर्ण प्रक्रियेत गॅस भरपूर वाया जातो. नेहमी स्वंयपाक करण्याआधी भांडी सुती कापडाने पुसून घ्यायला हवीत. ज्यामुळे गॅस वाचवणं सोपं होईल.
हाडं ठिसूळ करते व्हिटामिन B-12 ची कमतरता, ५ लक्षणं दिसू लागतात व्हा सावध
प्रेशर कुकरमध्ये स्वंयपाक करणं अगदी सोपं
प्रेशर कुकरमध्ये स्वंयपाक करणं खूपच सोपं आहे हे सर्वांनाच माहिती आहे. यामुळे गॅसची बचत होते हे खूप कमी लोकांना माहित असते. जर तुमचा गॅस लवकर संपत असेल तर जास्तीत जास्त पदार्थ प्रेशर कुकरमध्ये बनवणं फायदेशीर ठरू शकतं.
अन्न झाकण ठेवून शिजवा
अनेकदा तुम्ही लोकांना बोलताना ऐकलं असेल की अन्न उघडं ठेवून न शिजवता झाकण ठेवून शिजवायला हवं. असं केल्यानं त्यातील पोषक तत्व नष्ट होत नाहीत आणि गॅसची बचतसुद्धा होते.
गणेश चतुर्थीला ५ मिनिटांत काढता येतील अशा १० सोप्या रांगोळ्या; आकर्षक रांगोळ्यांनी सजवा दार
स्टोव्हचे बर्नर स्वच्छ ठेवा
बर्नर साफ करण्यासाठी स्टोव्हची फ्लेम वेगानं ठेवा. ज्यामुळे भांडी कमी वेळेत गरम होतील आणि कमीत कमी गॅस खर्च होईल. बर्नर घाणेरडा झाल्यामुळे अनेकदा व्यवस्थित चालत नाही आणि गॅस वाया जातो.