Lokmat Sakhi >Social Viral > How To Save LPG : स्वयंपाकाच्या गॅसची बचत करणाऱ्या 10 टिप्स, स्वयंपाकाचा गॅस खूप महागला, काळजीपूर्वक वापराचे उपाय

How To Save LPG : स्वयंपाकाच्या गॅसची बचत करणाऱ्या 10 टिप्स, स्वयंपाकाचा गॅस खूप महागला, काळजीपूर्वक वापराचे उपाय

How To Save LPG : गॅस वाचवण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याविषयी समजून घेऊया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 12:37 PM2022-05-19T12:37:13+5:302022-05-19T12:42:55+5:30

How To Save LPG : गॅस वाचवण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याविषयी समजून घेऊया...

How To Save LPG: 10 Cooking Gas Saving Tips, Cooking Gas Expensive, Careful Use Measures | How To Save LPG : स्वयंपाकाच्या गॅसची बचत करणाऱ्या 10 टिप्स, स्वयंपाकाचा गॅस खूप महागला, काळजीपूर्वक वापराचे उपाय

How To Save LPG : स्वयंपाकाच्या गॅसची बचत करणाऱ्या 10 टिप्स, स्वयंपाकाचा गॅस खूप महागला, काळजीपूर्वक वापराचे उपाय

Highlightsसौरऊर्जेवर पाणी तापवण्याची यंत्रणा सध्या अनेक सोसायटीमध्ये असते तिचा आवर्जून वापर करायला हवा.  अन्न लहान किंवा मोठ्या गॅसवर शिजवण्यापेक्षा ते मध्यम आचेवर अन्न शिजवणे केव्हाही अधिक योग्य

स्वयंपाकाचा गॅस ही आपली अनेक गरजांपैकी एक महत्त्वाची गरज आहे. पूर्वी चूल, स्टोव्ह यांचा स्वयंपाक करण्यासाठी वापर केला जायचा. मात्र जशी प्रगती होत गेली तसे आपण सगळेच स्वयंपाकासाठी गॅस सिलींडरचा म्हणजेच एलपीजीचा वापर करतो. दिवसभरात आपण खात असलेल्या बहुतांश गोष्टी या याच गॅसवर शिजवल्या जातात. इतर गोष्टींची महागाई ज्याप्रमाणे आसमान्यांचे कंबरडे मोडत आहे त्याचप्रमाणे एलपीजीच्या वारंवार वाढत असलेल्या किमतींमुळे आपले महिन्याचे बजेट कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गॅसला सध्या दुसरा कोणता चांगला पर्याय नसल्याने स्वयंपाकासाठी त्याचा वापर अनिवार्यच आहे. पण हाच गॅस आपण जपून वापरला तर तो आपल्याला जास्त दिवस पुरू शकतो (How To Save LPG). आता गॅस वाचवण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याविषयी समजून घेऊया... 

(Image : Google)
(Image : Google)

१. अनेकदा आपण स्वयंपाक करताना कढई गॅसवर ठेवतो आणि मग पदार्थाला लागणाऱ्या गोष्टींची तयारी करायला घेतो. पण यामुळे गॅस वाया जातो. त्यामुळे स्वयंपाक करायला घेतला की आधी आवश्यक असणाऱ्या वस्तू जवळ घेऊन, भाज्यांची चिराचिरी करुन मगच गॅस लावा. त्यामुळे वेळ तर वाचेलच पण गॅसचीही बचत होईल. 

२. स्वयंपाक करताना नेहमी योग्य आकाराचे कढई/पॅन वापरा. दोन किंवा तीन लोकांसाठी एखादा पदार्थ करायचा असेल तर लहान कढईचा वापर करा. अन्यथा मोठ्या आकाराचे भांडे तापण्यासाठी बराच गॅस वाया जाण्याची शक्यता असते. तसेच भांडी खूप जाडसर असतील तरीही ती तापण्यासाठी जास्त गॅस वाया जातो. त्यामुळे आपण वापरत असलेली भांडी योग्य पद्धतीची असतील याची काळजी घ्या. 

३. आपल्या गॅसचे बर्नर वेळच्या वेळी तपासून घ्या. अनेकदा बर्नरमध्ये घाण अडकल्याने गॅस मोठा केला तरीही तो बारीकच राहतो. किंवा काही वेळा गॅसची फ्लेम इतकी मोठी होते की ती भांड्याच्या बाजूने बाहेर येते. त्यामुळेही गॅस वाया जाण्याची शक्यता असते. 

४. गॅस बारीक केला म्हणजे आपण गॅसची बचत करतो असा आपला समज असतो. मात्र प्रत्यक्षात गॅस बारीक केला तर तो जास्त वेळ जळत राहतो. त्यामुळे तो जास्त वाया जातो. त्यामुळे पदार्थ आधी मोठ्या गॅसवर शिजवून किंवा उकळून घेऊन मग ज्योत थोडा वेळ बारीक करावी. 

५. काही वेळा आपल्याला पदार्थामध्ये नंतर काही घालायचे असते किंवा तो किती कसा शिजत आहे ते पाहायचे असते म्हणून आपण त्यावर झाकण न ठेवता शिजवतो. मात्र अशामुळे जास्त गॅस वापरला जातो. यामुळे स्वयंपाकासाठी गॅसवर तीनपट अधिक खर्च केला जाऊ शकतो. म्हणून अन्न शिजवताना ते झाकून शिजवायला हवे. 

६. दिवसभरात तुम्हाला स्वयंपाकासाठी वेगवेगळ्या ४ गोष्टी शिजवायच्या असतील तर त्या एकदाच कुकरमध्ये शिजवून घ्या आणि नंतर तो पदार्थ बनवा. यामुळे गॅसची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. भात-वरणाबरोबरच कडधान्य, भाजी कुकरमध्ये शिजवून घेतली तर गॅस वाचण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

७. दूध, भाज्या, फ्रोजन फूड शिजवण्यापूर्वी किमान 1 ते 2 तास आधी फ्रिजमधून बाहेर काढा. हे पदार्थ जास्त गार झालेले असल्याने ते गरम होण्यासाठी खूप वेळ लागतो. पण बाहेर काढून ठेवल्याने ते सामान्य तापमानाला आल्यास नंतर कमी गॅसवर गरम होऊ शकतात. 

८. पोळ्या, भाकरी किंवा डोसे करताना आपण पहिली पोळी किंवा डोसा काढल्यावर गॅस तसाच सुरू ठेवतो. मात्र त्यामुळे गॅस वाया जातो, अशावेळी पोळी किंवा भाकरी करण्याचा वेग वाढवायला हवा. तसेच डोसा, धिरडे करताना ते एकामागे एक पटापट घालायला हवे.

९. गॅसवर काहीही शिजवताना ते शक्यतो मध्यम आचेवर शिजवायला हवे. खूप मोठा गॅस केल्यास अन्न करपण्याची शक्यता असते तर गॅस लहान राहीला तर अन्न शिजायला खूप जास्त वेळ लागतो आणि यामध्ये गॅसही खूप वाया जातो. म्हणून मध्यम आचेवर अन्न शिजवणे केव्हाही अधिक योग्य असते. 

१०. सूर्यचूलीचा वापर हा गॅस बचतीसाठी उत्तम पर्याय असू शकतो. याबरोबरच सौरऊर्जेवर पाणी तापवण्याची यंत्रणा सध्या अनेक सोसायटीमध्ये असते तिचा आवर्जून वापर करायला हवा. 

Web Title: How To Save LPG: 10 Cooking Gas Saving Tips, Cooking Gas Expensive, Careful Use Measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.