''रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे'' या गाण्यांशिवाय होळीचा सण अधुरा आहे. पण या आनंदाच्या नादात फोटो काढताना मोबाइल पाण्यात पडला, भिजला तर? रंग खेळताना अनेकदा आपल्या मोबाईलमध्ये रंग किंवा पाणी जातं. फोन बिघडतो. समजा असं झालंच तर फार नुकसान होऊ नये म्हणून आपण झटपट काय करु शकतो(How To Protect Your Mobile Phone From Water And Colors).
मोबाईल लगेच स्वीच ऑफ करा
मोबाईल जर पाण्यात भिजला असेल, तर लगेच स्वीच ऑफ करा. ओला झालेला मोबाईल वापरणे धोकादायक ठरु शकते. यासह जर आपण स्क्रीन गार्डचा वापर करत असाल तर, ते देखील काढून टाका. असे केल्याने फोनमध्ये जास्त पाणी जाणार नाही.
सिम कार्ड आणि मेमरी कार्ड काढा
मोबाईल ऑफ केल्यानंतर त्याला स्वच्छ आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या. त्यानंतर त्याला टिशू किंवा टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा, जेणेकरुन अतिरिक्त पाणी निघून जाईल. त्यानंतर मोबाईलमधून सिम कार्ड आणि मेमरी कार्ड काढून घ्या.
व्हॅक्यूम बॅगमध्ये बंद करा
फोन व्हॅक्यूम बॅगमध्ये ठेवा, म्हणजे त्यातील पाणी बाहेर येईल.
मोबाईल कव्हर कळकट झाले? ३ घरगुती टिप्स, डिझाईननुसार साफ करा कव्हर, दिसतील नव्यासारखे..
बॅक पॅनल उघडून उन्हात ठेवा
मोबाईला सुकवण्यासाठी तुम्ही त्याचं बॅक पॅनल उघडून उन्हातही ठेवू शकता. उन्हात मोबाईलमधील पाणी लवकर सुकेल. पण, मोबाईल जास्तवेळ व कडक उन्हात ठेवू नका. त्यामुळे मोबाईलमधीन प्लास्टिक कम्पोनेंट वितळू शकते.
डेटा बॅकअप घ्या
मोबाईल सुरु झाल्यावर लगेच मोबाईलमधील डेटा बॅकअप घ्या.जर मोबाइल अधिक खराब झाला असेल, तर मोबाईलला सर्व्हिस सेंटरवर घेऊन जा.