भांडे विसळल्यानंतर ते आपण एकमेकांवर ठेवतो. आपल्याला वाटतं ते लहान- मोठे आहेत त्यामुळे एकमेकांमध्ये अडकून बसणार नाहीत. पण कधीतरी अनावधाने आपल्याकडून चूक होते आणि भांड्यात भांडं अगदी पक्कं फसून बसतं. खासकरून स्टीलचे भांडे असले की हे असं होतं. मग दोन पातेले, दोन वाट्या, दोन डबे किंवा वेगवेगळ्या आकाराचे दोन भांडे एकमेकांमध्ये इतके जास्त रुतून बसतात की मग त्यांना वेगळं काढणं कठीण होऊन जातं. शक्तीचे कितीही प्रयोग केले तरी ते भांडे काही एकमेकांमधून निघत नाहीत. म्हणूनच अशावेळी काय करायचं याच्या या काही सोप्या ट्रिक्स पाहून घ्या. यामुळे अगदी कमी मेहनतीत एकमेकांमध्ये फसून बसलेली भांडी वेगळी करता येतील. (How to separate two stainless steel bowls or pots that are stuck in each other)
एकमेकांत फसून बसलेले स्टीलचे भांडे कसे काढायचे?
१. गरम पाणी आणि बर्फ
हा एक सोपा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये एकमेकांमध्ये फसून बसलेली भांडी टाका. खालचं भांडं त्या पाण्यात बुडेल एवढं पाणी असावं.
त्यानंतर वरच्या भांड्यात बर्फाचे तुकडे टाका. साधारण अशा अवस्थेत ती भांडी ५ ते ७ मिनिटे राहीली आणि नंतर अलगद ओढली की लगेच वेगवेगळी होऊन जातील.
२. तेल
तेलाचा वापर करूनही एकमेकांमध्ये अडकलेली भांडी चटकन वेगळी करता येतात. यासाठी एक कापसाचा बोळा घ्या आणि तो तेलामध्ये बुडवा.
डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी प्रियांका चोप्राची आई सांगतेय घरगुती उपाय, ८ दिवसांतच दिसेल फरक
यानंतर त्या तेलकट बोळ्याने वरचं आणि खालचं भांडं जिथे एकमेकांना जोडलं गेलं आहे तिथून तेल आत सोडा. सगळीकडून भांड्याला व्यवस्थित तेल लागेल हे पाहा. त्यानंतर खालचं भांडं थोडं गरम करा आणि वरचं भांडं ओढून घ्या. भांडे लगेचच वेगवेगळे होतील.