Join us  

How To Make Curd : थंडीत दही नीट लागत नाही? फक्त १ ट्रिक वापरा, घरीच दही बनेल घट्ट, मलाईदार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 4:48 PM

How to make curd or dahi at home : थंडीच्या वातावरणात दही घरी बनवणं म्हणजे सगळ्यात कठीण काम.

दही अनेकांना दुपारच्या जेवणात लागतच. अगदीच दही खाल्लं नाही तर कढी खायला सर्वांनाच आवडते. दही नेहमी नेहमी बाजारातून आणण्यापेक्षा घरी बनवलेलं असेल तर कधीही उत्तम. पण जर दही घरी व्यवस्थित बनतच असं नाही.  थंडीच्या वातावरणात दही घरी बनवणं म्हणजे सगळ्यात कठीण काम. म्हणूनच या लेखात दही बनवण्याची सोपी ट्रिक पाहूया. (Study shows health benefits of cherimoya or custard apple sitafal helps to protect hear)

दही बनवण्याच्या इतर पद्धती

घरी दही बनवण्याची ही सर्वात पारंपारिक पद्धत आहे. यासाठी आधी अर्धा लिटर दूध घ्या (तुम्ही तुम्हाला हवे तेवढे दूध घेऊ शकता). आता गॅसवर दूध गरम करण्यासाठी ठेवा. दूध उकळायला लागल्यावर गॅस बंद करून दूध थंड होऊ द्या. दूध कोमट राहिलं की त्यात दही चारी बाजूने आणि मध्यभागी टाका. यानंतर, दूध सपाट आणि उबदार ठिकाणी झाकून ठेवा. विर्जण घातल्यावर दुध पुन्हा पुन्हा ढवळू नका, नाहीतर दही व्यवस्थित होणार नाही.

आता दह्याच्या भांड्याच्या वर जाड कापड ठेवा. आता 5-6 तास असेच राहू द्या. दही सेट झाल्यावर त्याची वरची मलई घट्ट होण्यासाठी किमान २ तास फ्रीजमध्ये ठेवा. अशा प्रकारे तुम्ही बाजारासारखे घट्ट दही बनवू शकता. जर तुम्हाला बाजारातील दही खायला आवडत नसेल आणि दही लवकर सेट करायचे असेल तर तुम्ही मायक्रोवेव्ह किंवा ओव्हनची मदत घेऊ शकता. 

यासाठी प्रथम तुम्ही गॅसवर दूध गरम करा आणि नंतर दूध थोडे कोमट होईपर्यंत थंड करा. यानंतर दुधात दही घालून झाकून ठेवावे. आता मायक्रोवेव्ह चालू करा आणि 180 अंशांवर सुमारे 2 मिनिटे प्री-हीट केल्यानंतर ते बंद करा. यानंतर दही आणि दुधाचे भांडे मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. या वेळी ओव्हनचे झाकण बंद असले पाहिजे. दही तीन ते चार तासांत सेट होईल.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया