Join us  

चाकू-सुऱ्या गंजल्या, धार नाही ? २ सोप्या ट्रिक, गंज निघून चाकू-सुऱ्या होतील धारदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2024 4:35 PM

How To Sharpen a Blunt Knife At Home Without Any Knife Sharpener : 2 Simple Ways To Sharpen A Knife Without A Sharpener : रोजच्या वापरातील चाकू, सुऱ्या वापरुन गंजल्या, धार गेली तर करावेत असे २ सोपे उपाय...

किचनमध्ये रोजचा स्वयंपाक तयार करण्यासाठी आपण विविध उपकरणांचा आणि भांड्यांचा वापर करतो. यामध्ये आपण चाकू, सूरी, कात्री यांचा रोजच्या रोज वापर करतो. भाजी, फळे इतर काही गोष्टी कापण्यासाठी आपण सूरी किंवा चाकू आणि कात्रीचा वापर करतो. किचनमध्ये असणाऱ्या चाकू, सुरीचा आणि कात्रीचा वापर दररोज होत असल्यामुळे काही कालांतराने त्याची धार बोथट होऊन जाते. सूरी किंवा चाकू वापरुन त्याची धार बोथट झाल्यावर त्याने नीट कापता किंवा चिरता येत नाही. सूरी, चाकू किंवा कात्री जितके धारदार असतात तितकेच स्वयंपाक, घरातील इतर कामे पटापट उरकता येतात. चाकू, सूरी, कात्री यांना योग्य प्रमाणात धार नसली की अशा चाकू, सुरीने पदार्थ कापताना फार वेळ जातो(2 Simple Ways To Sharpen A Knife Without A Sharpener).

आपण किचनमध्ये धारदार चाकू, सूरी यांचा सर्रास वापर करतो. चाकू, सूरी यांची धार चांगली असेल तर फळं, भाज्या इतर गोष्टी अगदी पटापट कापल्या जातात. परिणामी, आपला वेळ वाचतो आणि स्वयंपाकही झटपट होतो. पूर्वी चाकू - सुऱ्यांना धार काढण्यासाठी काही लोक दारी फिरायचे. परंतु  बदलत्या काळानुसार आता चाकू, सुऱ्यांना धार काढण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. घरच्याघरी चाकू, सुऱ्या, कात्रीना धार काढण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवूयात(How To Sharpen a Blunt Knife At Home Without Any Knife Sharpener).  

१. चाकू, सूरी, कात्रीना धार काढण्याची सोपी ट्रिक... 

१. सर्वप्रथम ज्या चाकू, सूरी, कात्रीना धार काढायची आहे त्यांना घरातील दात घासायची टूथपेस्ट लावून घ्यावी. त्यानंतर लगेचच एक सिरॅमिक कप घेऊन तो उलटा केल्यानंतर त्याच्या पृष्ठभागांच्या कडांवर थोडेसे पाणी घालून या चाकू, सुऱ्या, कात्री घासून घ्याव्यात. आता एक कॉटनचे कापड किंचित ओले करुन ही निघालेली गंज व्यवस्थित पुसून घ्यावी. चाकू, सुरी, कात्री व्यवस्थित वाळवून घ्याव्यात. त्या वाळल्यानंतर त्यावर थोडेसे खोबरेल तेल लावून थोड्या वेळासाठी तसेच ठेवून द्यावे. या ट्रिकचा वापर केल्याने घरच्या घरी आपल्या चाकू, सूरी, कात्रीना धार काढणे सोपे जाईल. त्याचबरोबर चाकू, सूरी, कात्री यांच्यावर गंज चढला असेल तर हा गंज काढून टाकण्यास यादेखील ही ट्रिक फायदेशीर ठरेल.

शाळेच्या युनिफॉर्मवर रोज शाईचे डाग? मुलांना ओरडण्यापेक्षा करा २ सोप्या टिप्स, युनिफॉर्म दिसेल नव्यासारखा...

 

२. या दुसऱ्या ट्रिकमध्ये सर्वप्रथम सुरीला गॅसच्या मंद आचेवर किमान १० ते १५ मिनिटांसाठी गरम करून घ्यावे. त्यानंतर लगेचच एक सिरॅमिक कप घेऊन तो उलटा केल्यानंतर त्याच्या पृष्ठभागांच्या कडांवर ही गरम सूरी २० ते ३० अंशामध्ये ५ ते ६ वेळा घासून घ्यावी. अशाप्रकारे आपण चाकू, सूरी, कात्रीना घरच्याघरी  धारदार करु शकतो.

टी बॅग्स फेकून नका - करा 'असा' वापर, स्किन ते गार्डनिंग अनेक समस्यांवर खास उपाय...

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्स