Lokmat Sakhi >Social Viral > चाकू-सुऱ्यांना धारच नाही, भाजी चिरायला फार वेळ लागतो? २ झटपट टिप्स, सुऱ्या धारदार...

चाकू-सुऱ्यांना धारच नाही, भाजी चिरायला फार वेळ लागतो? २ झटपट टिप्स, सुऱ्या धारदार...

How To Sharpen A Blunt Knife At Home Without Any Knife Sharpener : धार नाही म्हणून घरात चाकू-सुरे नुसते पडून राहतात? घ्या झटपट उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2023 06:15 PM2023-03-10T18:15:03+5:302023-03-10T18:18:24+5:30

How To Sharpen A Blunt Knife At Home Without Any Knife Sharpener : धार नाही म्हणून घरात चाकू-सुरे नुसते पडून राहतात? घ्या झटपट उपाय

How To Sharpen A Blunt Knife At Home Without Any Knife Sharpener | चाकू-सुऱ्यांना धारच नाही, भाजी चिरायला फार वेळ लागतो? २ झटपट टिप्स, सुऱ्या धारदार...

चाकू-सुऱ्यांना धारच नाही, भाजी चिरायला फार वेळ लागतो? २ झटपट टिप्स, सुऱ्या धारदार...

किचनमध्ये रोजचा स्वयंपाक तयार करण्यासाठी आपण विविध उपकरणांचा व भांड्यांचा वापर करतो. यामध्ये आपण सूरी, चाकू यांचा रोजच्या रोज वापर करतो. भाजी, फळे इतर काही गोष्टी कापण्यासाठी आपण सूरी किंवा चाकूचा वापर करतो. किचनमध्ये असणाऱ्या सूरी व चाकूचा वापर दररोज होत असल्यामुळे काही कालांतराने त्याची धार बोथट होऊन जाते. चाकू किंवा सूरी वापरुन वापरुन त्याची धार बोथट झाल्यावर त्याने नीट कापता किंवा चिरता येत नाही. सूरी, चाकू जितके धारदार तितकेच स्वयंपाक घरांतील कामे पटापट उरकता येतात. चाकू, सूरी यांना योग्य धार नसली की, अशा सुरीने पदार्थ कापताना फार वेळ जातो.  

आपण किचनमध्ये धारदार चाकू, सूरी यांचा सर्रास वापर करतो. चाकू, सूरी यांची धार चांगली असेल तर फळ, भाज्या, सॅलेड पटापट कापली जातात, परिणामी  आपला वेळही वाचतो. तसेच स्वयंपाक झटपट बनवून होतो. पूर्वी चाकू - सुऱ्यांना धार काढण्यासाठी काही लोक दारोदारी फिरायचे. परंतु बदलत्या काळानुसार, आता चाकू, सुऱ्यांना धार काढण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. घरच्या घरी चाकू - सुऱ्यांना धार काढण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स लक्षांत ठेवूयात(How To Sharpen A Blunt Knife At Home Without Any Knife Sharpener).


१. सुरीला धारदार करण्यासाठी नक्की काय करता येईल? 

१. सर्वप्रथम सुरीला गॅसच्या मंद आचेवर १० ते १५ मिनिटांसाठी गरम करुन घ्यावे. 

२. त्यानंतर लगेचच एक सिरॅमिक कप घेऊन तो उलटा केल्यानंतर त्याच्या पृष्ठभागाच्या कडांवर ही गरम सूरी २० ते ३० अंशामध्ये ५ ते ६ वेळा घासून घ्यावी. 

असे केल्याने आपल्या सुरीला घरच्या घरी धारदार करणे सोपे जाईल. 

शार्पनिंग स्टोन अर्थात धार काढायचा दगड आजकाल बाजारांत कुठल्याही दुकानांत सहज विकत मिळतो. आपण या शार्पनिंग स्टोनची मदत घेऊन देखील घरच्या घरी झटपट सुरीला धारदार करु शकता. 

२. शार्पनिंग स्टोनच्या मदतीने सुरीला धारदार करण्याची योग्य पद्धत : -

१. बाजारांत मिळणारा शार्पनिंग स्टोन आपल्या आवडीनुसार निवडावा. 

२. सूरी किंवा चाकूला धार काढण्यासाठी शार्पनिंग स्टोनवर पाणी किंवा तेल घालावे. 

३. आता आपली चाकू किंवा सूरी ज्याला धार काढायची आहे ते या दगडाच्या पृष्ठभागांवर २० ते ३० अंशामध्ये ५ ते ६ वेळा घासून घ्यावे. 

अशाप्रकारे आपण घरच्या घरी शार्पनिंग स्टोनचा वापर करुन झटपट घरांतील कैची, चाकू, सूरी यांना धार काढू शकतो.

Web Title: How To Sharpen A Blunt Knife At Home Without Any Knife Sharpener

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.