Join us  

किसणीला धार नाही, हात दुखून येतात ? १ सोपी ट्रिक, किसणी होईल नव्यासारखी धारदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2023 10:52 PM

How To Sharpen Graters Easy & Effective At Home.: जुन्या किसणीवर डाग पडतात, धार कमी होते त्यासाठी खास उपाय...

जेवण झटपट बनवायचे म्हटलं की आपल्याला अनेक उपकरणांची मदत घ्यावी लागते. आपला स्वयंपाक झटपट व्हावा यासाठी आपल्या किचनमध्ये अशी अनेक उपकरणे असतात. वाटण - घाटण करण्यापासून ते अगदी संपूर्ण स्वयंपाक तयार होऊन येईपर्यंत आपल्याला अनेक उपकरणांची गरज भासते. आपल्या स्वयंपाक घरात लहान किसणीपासून ते अगदी फूड प्रोसेसरपर्यंत सगळ्याच उपकरणांचा वापर केला जातो. यातील काही उपकरणं ही रोजच्या वापरातील असतात तर काही क्वचितच वापरली जातात. क्वचितच वापरली जाणारी उपकरणं ही बराच काळ तशीच वापर न केल्याने कालांतराने खराब होतात. अशा किचनमध्ये रोजच्या वापरात नसलेल्या वस्तू खराब होण्यापासून वाचवण्यासाठी त्या उपकरणांची काळजी घ्यावी लागते(What's the best way to sharpen a food grater?).

किचनमध्ये असणारी रोजच्या वापरातील सूरी , किसणी ही धारदारचं असावी लागते. जर सूरी किंवा किसणीला धार नसेल तर कापताना, चिरताना अडचणी येतात. अगदीच घाई गडबडीच्या वेळी आपल्याकडे वेळ नसला की आपण काही पदार्थ किसणीवर किसून बारीक करतो. परंतु या किसणीला जर धारच नसेल तर त्यावर कोणताही पदार्थ व्यवस्थित किसला जाणार नाही. यासाठी जर किसणीची धार (How Do I Sharpen A Cheese Grater?) कमी झाली असेल तर घरच्या घरी एक सोपी ट्रिक वापरुन आपण या किसणीला पुन्हा पहिल्यासारखे धारदार(Sharpen grater blade in just 1 minute) करु शकतो. किसणीची धार कमी झाल्यास त्याला पुन्हा धार येण्यासाठी कोणती ट्रिक वापरावी, हे पाहूयात(How To Sharpen Graters Easy & Effective At Home).

किसणीची धार पुन्हा आणण्यासाठी एक सोपी ट्रिक... 

 किचनमधील जुनी किंवा रोजच्या वापरात नसलेली किसणी तशीच ठेवून कालांतराने खराब होते. या किसणीवर काहीवेळा डाग पडतात किंवा त्याची धार कमी होते. अशी धार नसलेली किसणी वापरणे शक्य होत नाही अशावेळी आपण एक घरगुती सोपी ट्रिक वापरुन या किसणीची धार पुन्हा आणू शकतो. याचबरोबर या किसणीवर पडलेले जुनाट डाग अगदी झटपट काढू शकतो. 

मिक्सर ग्राईंडरच्या खालचा भाग स्वच्छ करणे कठीण काम? १ सोपी ट्रिक, मिक्सर ग्राईंडर दिसेल नव्यासारखे..

मातीची भांडी हौसेने वापरतो पण ती अस्वच्छ राहिली तर ? मातीची भांडी स्वच्छ करण्याच्या ५ टिप्स...

जुन्या किसणीवरील डाग नाहीसे करून त्याची धार पुन्हा आणण्यासाठी आपल्याला टोमॅटो केचअप व अ‍ॅल्युमिनियम फॉईल या दोन गोष्टींची मदत लागेल. यासाठी सर्वप्रथम टोमॅटो केचअप घेऊन ते किसणीवर पडलेल्या जुन्या डागांवर तसेच संपूर्ण किसणीवर लावून घ्यावे. आता हे टोमॅटो केचअप ५ ते १० मिनिटांसाठी तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर अ‍ॅल्युमिनियम फॉईल घेऊन त्याचा एक गोळा बनवून तो गोळा किसणीवर घासून किसून घ्यावा. त्यानंतर किसणी लिक्विड डिशवॉश लावून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. ही सोपी झटपट ट्रिक वापरून आपण जुन्या धार गेलेल्या किसणीची धार पुन्हा आणू शकतो. याचबरोबर किसणीवर पडलेले जुनाट तेलकट डाग अतिशय सहजरित्या काढू शकतो.

नॉनस्टिक भांड्यांवरील कोटिंग निघतेय ? तुम्हीसुद्धा करत नाहीत ना या ५ चुका, भांड्यांवरचे कोटिंग होईल खराब...

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्स