(Image Credit- Toronto Star)
स्वयंपाकघरात सुरीशिवाय कोणतंही काम करता येत नाही. प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीसाठी सुरू लागते. आता असे किती वेळा होते की किचनमध्ये २-३ सुऱ्या आहेत, पण त्या काही उपयोगाच्या नाहीत. सुरीचे काम म्हणजे वस्तू कापणे आणि जेव्हा तेच काम सुरीला जमत नाही तेव्हा ते निरुपयोगी साधनासारखे असते. (Home Hacks) चाकू धारदार नसेल तर त्यामुळे कामही लांबतं आणि अशा स्थितीत सुरी हातातून निसटली तर इजा होण्याची भीती असते. (How to Sharpen a Knife in the Right Way) फक्त खालची धार कमकुवत आहे म्हणून तुम्ही जुनी सुरी फेकून देता. सुरी किंवा चाकूची धार वाढवण्यासाठी तुम्हाला दुकानात जायची काहीच गरज नाही. घरच्याघरी तुम्ही कॉफी मगचा वापर करून सुरीची धार वाढवू शकता. (How to sharpen knife with coffee mug)
घरात कॉफी पिणारे असो वा नसो, लोकांच्या घरात नेहमीच कॉफीचा मग असतो. याच कॉफी मग वापरून तुम्ही तुमच्या चाकूची धार धारदार करू शकता. किंबहुना, कॉफी मगचा तळाचा भाग तीक्ष्ण दगडासारखा काम करतो ज्यावर चाकू धारदार केले जातात. यासाठी तुम्ही कोणताही जुना किंवा नवीन कॉफी मग घेऊ शकता, फक्त पृष्ठभाग तुटलेला नसेल याची खात्री करा. (What is the best way to sharpen a knife)
तुमच्याकडे एका बाजूनं कापायची सोय असलेला चाकू असल्यास, तुम्हाला फक्त ती बाजू तीक्ष्ण करावी लागेल. म्हणून चाकू मगच्या तळाशी सपाट पृष्ठभागावर ठेवा. दुसरीकडे, जर तुमच्याकडे पारंपारिक दुहेरी-बाजूच्या ब्लेडसह चाकू असेल तर दुसऱ्या बाजूला समान प्रक्रिया करा. हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे कपवर जास्त दाब द्यावा लागणार नाही. (Simple Ways to Sharpen a Knife)
जसे तुम्ही सुरीला दगड किंवा स्टीलवर घासून तीक्ष्ण करता त्याचप्रमाणे कॉफी मग वर करा. ब्लेडला सुमारे 45-अंशाच्या कोनात धरा आणि कपच्या तळापासून टोकापर्यंत काळजीपूर्वक चालवा. या उपायानं तुमचा सिरॅमिक कॉफी मग चाकूची धार धारदार करेल. तुम्हाला ही क्रिया किमान 5-7 मिनिटं करावी लागेल. सुरी धारदार केल्यावर कोणतंही फळ आणि भाज्या कापून एकदा त्याची चाचणी करा. चाकूची धार तीक्ष्ण झाली आहे असे वाटल्यावर एकदा गरम पाण्यात धुवून स्वच्छ करा आणि नंतर स्वयंपाकघरातील कामांसाठी वापरा.