किचनमधील अशा अनेक वस्तू आहेत, ज्यांचा वापर दैनंदिन आयुष्यात दररोज होतो. त्यातीलच एक वस्तू म्हणजे चाकू (Knife). भाज्या, फळे, यासह इतर काही गोष्टी चिरण्यासाठी आपण चाकूचा वापर करतो. सध्या बाजारात चॉपर मिळतात. ज्यामुळे झटपट भाज्या बारीक चिरल्या जातात. परंतु, चाकू असो किंवा चॉपर, वारंवार वापर केल्याने त्याची धार कमी होते. धार कमी झाल्यामुळे भाजी चिरताना अडचण निर्माण होते. भाज्या किंवा फळे नीट चिरल्या जात नाही. त्यामुळे असे बोथट चाकू काही कामाच्या नसतात.
चाकूची धार शार्प करण्यासाठी आपल्याला भांड्यांच्या दुकानात जावे लागते. यामुळे वेळही जातो, पैसेही खर्च होतात. जर आपल्याला घरच्या घरी चाकूला धार काढायची असेल तर, चहाच्या कपचा वापर करा. चहाच्या कपच्या मदतीने चाकूला धार कशी काढायची पाहूयात(How to Sharpen a Knife on a Coffee Mug).
चाकू, चॉपरवर धार काढण्यासाठी सोपा आणि झटपट उपाय
चहा किंवा कॉफी कपच्या मदतीने आपण चाकू किंवा चॉपरवर धार काढू शकता. यासाठी चहाचा कप उलटा ठेवा. ज्याप्रमाणे गावाकडील लोकं दगडावर घासून चाकूवर धार काढतात, त्याचप्रमाणे चहाच्या कपच्या मागे घासून चाकूवर धार काढा. चहाचा कप हा चीनी मातीचा वापर करून तयार करण्यात येतो.
चहाच्या कपचा खालचा भाग खडबडीत असतो. म्हणून त्यावर घासल्याने चाकूला धार काढण्यास सोपं जातं. हळुवारपणे घासल्याने काही मिनिटात चाकूवर धार निघेल. धार काढण्याआधी आपण चाकूला गॅसवर गरम देखील करू शकता.
शार्पनिंग स्टोन
चाकूला धार काढण्यासाठी आपण शार्पनिंग स्टोनचा देखील वापर करू शकता. शार्पनिंग स्टोन बाजारात सहजरित्या उपलब्ध आहे. शार्पनिंग स्टोनवर पाणी किंवा तेल लावून आपण चाकूला धार काढू शकता. यासाठी दगडाच्या पृष्ठभागांवर २० ते ३० अंशामध्ये ५ ते ६ वेळा घासून घ्या. नंतर चाकू पाण्याने धुवून घ्या.