स्वंयपाकघरातील काम पटापट होण्यासाठी मिक्सरचा वापर फायदेशीर ठरतो. ज्यूस बनवण्यासाठी, वाटण करण्यासाठी कोणताही खाद्यपदार्थ बारीक दळण्यासाठी मिक्सरचा वापर केला जातो. पण कधी कधी मिक्सरच्या ब्लेडची धार कमी झाल्यानं पदार्थ पटापट वाटून होत नाहीत. (How to sharpen grinder blades with sandpaper)
मिक्सरच्या भांड्याची धार वाढवण्यासाठी काही सोपे उपाय फायदेशीर ठरू शकतात. ग्राइंडरचे ब्लेड खराब झाल्यामुळे मसाले व्यवस्थित दळले जात नाही. तुमच्या बाबतीतही असे होत असेल तर काळजी करू नका. यासाठी आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे मिक्सर ग्राइंडरच्या ब्लेडची धार तीक्ष्ण केली जाऊ शकते. (Cooking Hacks & Tips)
सॅण्ड पेपरचा वापर
मिक्सर ग्राइंडरच्या ब्लेडला तीक्ष्ण करण्यासाठी तुम्ही सॅन्ड पेपर वापरू शकता. याच्या मदतीने धार अगदी सहजतेने धारदार करता येते. आपण कोणत्याही हार्डवेअर स्टोअरमधून सॅन्ड पेपर खरेदी करू शकता. त्याची किंमत खूपच कमी आहे. तुम्हाला ते बाजारात अवघ्या 10-20 रुपयांना मिळेल. सॅण्ड पेपरने मिक्सर ग्राइंडरची धार धारदार करण्यासाठी, प्रथम मिक्सरचं भांडं उघडा आणि ते बाहेर काढा. यानंतर हे ब्लेड चांगले धुवा.
आता सॅण्ड पेपरचा तुकडा घ्या. यानंतर या तुकड्याने ब्लेड घासून घ्या. सुमारे 10 ते 15 मिनिटे अशा प्रकारे ब्लेडला सॅन्ड पेपरने घासून घ्या. यानंतर पुन्हा पाण्याच्या मदतीने धुवा. तुम्हाला दिसेल की धार खूप तीक्ष्ण झाली आहे. आता पुन्हा ग्राइंडरमध्ये ठेवा. ब्लेडची धार करताना काळजी घ्या. यामुळे तुमचे हातही कापले जाऊ शकतात.
मिक्सर ब्लेडची धार वाढवण्यासाठी तुम्ही इतर अनेक गोष्टी देखील वापरू शकता. यासाठी तुम्ही मिक्सर बेल्टची धार प्युमिस स्टोन, अॅल्युमिनियम फॉइल किंवा लोखंडी रॉडने वाढवू शकता. याशिवाय, सामान्य दगडाच्या मदतीने, आपण धार देखील धारदार करू शकता.
आपण काहीही वापरण्यापूर्वी हॅण्ड ग्लोव्हज घालणे आवश्यक आहे. मिक्सरच्या भांड्याला धार करण्याची सगळळ्यात सोपी पद्धत म्हणजे सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात काळं मीठ काढून घ्या आणे हे मिठाचे खडे मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या. यामुळे मिक्सरचे ब्लेड्स धारदार होण्यास मदत होईल.