मिक्सरचा वापर आपण नेहमीच करतो. काही काही घरांमध्ये तर अगदी रोजच्या रोज वेगवेगळे पदार्थ करण्यासाठी मिक्सरची मदत घेतलीच जाते. त्यामुळे जास्त वापर झाला की साहजिकच मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडची धार बोथट होत जाते. कडक पदार्थ त्यात आपल्याला हवे तसे बारीक करता येत नाहीत. किंवा मग अगदी रोजचे पदार्थही आपल्याला पाहिजे तसे वाटून निघत नाहीत. अशावेळी ब्लेड बदलायला नेली तर त्याचा बराच खर्च असतो. म्हणूनच हा खर्च टाळायचा असेल तर तुमच्या घरातल्या काही टाकाऊ वस्तू वापरा आणि मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडला अगद धारदार करा (how to sharpen mixer grinder blade?). त्यासाठी नेमक्या कोणत्या वस्तू कशा पद्धतीने वापरायच्या ते पाहूया..( 2 simple home hacks to sharpen mixer grinder blade)
मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडला कशी धार लावावी?
१. मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडला धार लावण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणारी एक टाकाऊ वस्तू म्हणजे गोळ्यांची रिकामी झालेली पाकिटं. ही पाकिटं बऱ्यापैकी कडक असतात.
उन्हाळ्यात जेड प्लांट सुकलं, पानं गळू लागली? ६ टिप्स- पुन्हा बहरून हिरवेगार होईल
कात्री घेऊन या रिकाम्या पाकिटांचे लहान लहान तुकडे करा. त्यानंतर हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घाला आणि हळूहळू मिक्सरची स्पीड वाढवत एखादा मिनिट मिक्सर फिरवा. त्यानंतर एक- दोन मिनीटांचा ब्रेक घेऊन पुन्हा मिक्सर फिरवा. भांड्याला चांगली धार लागलेली असेल.
२. मिक्सरच्या भांड्याला धार लावण्याचा दुसरा एक उपाय म्हणजे ॲल्युमिनियम फॉईल. हल्ली असे फॉईल हॉटेलमधून घरी मागविण्यात येणाऱ्या प्रत्येक पदार्थासोबत मिळतात.
हे फॉईल आपण सरळ कचऱ्यामध्ये टाकून देतो. पण त्याऐवजी ते कापून त्याचे छोटे छोटे बॉल करून मिक्सरच्या भांड्यात घाला आणि मिक्सर फिरवा. अगदी एक- दोन मिनिटांत मिक्सरच्या भांड्याला चांगली धार लागेल.