Join us  

रोजचे टॉवेल वापरून कापड झाले कडक व खराब ? टॉवेल धुण्याच्या टिप्स, कापड राहील मऊसूत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2023 3:15 PM

5 Tips To Make Your Towels Soft & Fluffy : रोजच्या वापरातील टॉवेल धुवून, वापरून त्याचे कापड झाले खराब... टॉवेल कायम मऊ, कोमल राहण्यासाठी काही खास टिप्स...

टॉवेल हे आपल्या रोजच्या वापरात आंघोळ केल्यानंतर अंग पुसायला लागतच. हे रोजच्या वापरातलं टॉवेल जितकं स्वच्छ, आणि नीटनेटकं असेल तितकं ते आपल्याला वापरायला आवडत. शक्यतो आपल्यापैकी बऱ्याचजणांना मऊसूत, नरम, हातांना कोमल लागणारे असे टॉवेल वापरायला आवडते. शक्यतो घरात प्रत्येकाचा असा एक स्वतःचा रोजच्या वापरातला वेगळा टॉवेल असतोच.याचबरोबर काही व्यक्तींना त्यांचा त्यांचा ठरलेला असा हात - पाय पुसायचा, अंग पुसायचा असा वेगळा टॉवेल ठरलेला असतोच. 

रोजच्या वापरातील हे टॉवेल आपण वेळोवेळी धुवून स्वच्छ करत असतोच. बरेचदा आपण पाहिले असेल की आपले टॉवेल धुतल्यानंतर त्याचे कापड हे अतिशय कडक किंवा थोडे खरखरीत होते. अशा कडक, खरखरीत टॉवेलने आपल्याला अंग पुसणे आवडत नाही. बऱ्याच लोकांना अंग पुसायचा टॉवेल हा मऊ आणि कोमल लागतो. असे असले तरीही नवीन टॉवेल कालांतराने वापरून व धुवून जुना होतोच व त्याच्या कापडात देखील आपल्याला फरक दिसू लागतो. अशा परिस्थितीत, आपला टॉवेल कायम मऊ व कोमल ठेवायचा असल्यास ते धुण्याच्या पद्धतीत थोडे बदल केले पाहिजे(How to soften towels and keep them soft – for luxury every day).

टॉवेल वारंवार धुतल्यानंतर त्याचे कापड कडक का होते ? 

बरेचदा आपण टॉवेल धुताना ते चांगले स्वच्छ व्हावे यासाठी हार्श केमिकल्सयुक्त डिटर्जंट किंवा साबणाचा वापर करतो. टॉवेलचे कापड खराब होण्यामागे हेच सर्वात मुख्य करण असते. हार्श केमिकल्सयुक्त डिटर्जंट किंवा साबणाचा वापर करून टॉवेल कितीही स्वच्छ धुतले तरीही त्यातील केमिकल्स हे एका धुण्यात जात नाहीत. त्यामुळे हे टॉवेल वाळल्यानंतर त्याचे कापड कडक होते. टॉवेल धुतल्यानंतर त्याचे कापड कडक होऊ नये म्हणून ते धुतल्यानंतर काही काळ फॅब्रिक सॉफ्टनर मध्ये भिजत ठेवावे. यामुळे टॉवेल धुतल्यानंतरही पूर्वीसारखे मऊ राहते. 

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकण्यापूर्वी करा ६ गोष्टी, कपडे भूरकट होणं टाळा...

टॉवेल धुताना किती प्रमाणात डिटर्जंट वापरावे ? 

टॉवेल धुताना शक्य तितक्या कमी डिटर्जंटचा वापर करावा. जर आपण आपले रोजचे टॉवेल इतर कपड्यांसोबत वॉशिंग मशीनमध्ये धूत असाल तर तसे करू नका. टॉवेल इतर कपड्यांपेक्षा वेगळे धुण्यास टाकावे. 

एकदा वापरलेला बटर पेपर फेकून न देता, पुन्हा वापरण्याची १ भन्नाट ट्रिक...

टॉवेल धुताना गरम पाण्याचा वापर करावा... 

शक्यतो टॉवेल वॉशिंगमशीनमध्ये इतर कपड्यांसोबत धुवायला न टाकता वेगळा धुवावा. टॉवेल धुताना शक्यतो गरम पाण्याचा वापर करावा. टॉवेल गरम पाण्यात धुतल्याने त्यातील डिटर्जंटचे लहान लहान कण सहजपणे निघून जाण्यास मदत होते. टॉवेल धुताना डिटर्जंट संपूर्णपणे पाण्यांत विरघळल्यानंतरच त्यात टॉवेल भिजत घालावा. 

हॉटेलात घालतात तशी ताठ-एकही सुरकुती नसलेली बेडशीट घरच्या बेडवर कशी घालायची ? ५ टिप्स...

व्हिनेगरचा वापर करा... 

डाग दूर करण्यासोबतच कपडे मऊ ठेवण्यासाठीही व्हिनेगर गुणकारी आहे. अशा परिस्थितीत, टॉवेलला व्हिनेगरच्या पाण्याच्या द्रावणात 2-3 महिन्यांतून एकदा धुणे हा एक अतिशय सोपा आणि प्रभावी मार्ग आहे ज्यामुळे तो बराच काळ मऊ राहतो.

वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...

बेकिंग सोड्याचा वापर करा... 

डिटर्जंट आणि बेकिंग सोडाच्या द्रावणात टॉवेल धुणे खूप फायदेशीर आहे. असे केल्याने टॉवेल देखील मऊ राहतात, तसेच ते डाग आणि दुर्गंधी देखील पूर्णपणे काढून टाकतात.

टॅग्स :सोशल व्हायरल