सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण दिवसभरात अनेक प्रकारच्या ट्यूब्सचा वापर करतो. सकाळी उठल्यावर टूथपेस्टची ट्यूब, आंघोळ झाल्यानंतर मॉइश्चरायझर, लोशनची ट्यूब अशा अनेक ट्यूब्सचा वापर सतत होत असतो. या ट्यूब्स नव्याकोऱ्या असताना यातून क्रिम, पेस्ट घेणे सोप जात, परंतु या ट्यूब्स संपत आल्या की, त्यातील उरलेली क्रिम, लोशन, पेस्ट काढणे कठीण जाते. अशावेळी आपण हाताने दाबून दाबून यातील क्रिम, पेस्ट काढण्याचा प्रयत्न करतो. काहीवेळा तर आपण चक्क स्वयंपाक घरातील लाटण घेऊन या ट्यूब्स लाटण्याने लाटून घेतो. आणि आतील उरलेली क्रिम, लोशन, पेस्ट वापरण्यासाठी काढतो(How to use the end of a squeezy tube).
शक्यतो अशा ट्यूब्स संपत आल्या की त्याच्याआत असणारी क्रिम, पेस्ट किंवा लोशन काढणे कठीण जाते. परंतु आपण यासाठी एका सोपी युक्ती करु शकतो. एक सहजसोपा हॅक वापरून आपण झटपट या ट्यूब्सच्या आतील उरलेली क्रिम किंवा लोशन पटकन काढू शकतो. यामुळे ट्यूबच्या आत उरलेली क्रिम किंवा लोशन (Get All The Lotion From A Tube) वाया न जाता आपण हे वापरु शकतो. यासाठीच कोणत्याही प्रकारची ट्यूब असेल तर ती फेकून देण्यापूर्वी हा सोपा हॅक नक्की ट्राय करुन पाहा. हा झटपट उपाय केल्याने आपण ट्यूबच्या आत उरलेले लोशन, क्रिम अगदी संपूर्णपणे संपेपर्यंत वापरु शकता(How to squeeze the leftover cream out of a tube).
ट्यूब मधली क्रिम - लोशन संपत आले असेल तर काय करावे ?
ट्यूब मधली क्रिम - लोशन संपत आले असेल तर आतील उरलेली क्रिम बाहेर काढण्यासाठी आपण एका सोपा उपाय नक्की ट्राय करु शकता. यासाठी सर्वातआधी जी ट्यूब संपली आहे ती उलटी हातात धरावी, म्हणजेच ट्यूबचे झाकण खालच्या बाजूस येईल अशा पद्धतीने. त्यानंतर कात्रीने ट्यूबचा शेवटचा भाग कापून घ्यावा.
त्यानंतर याच ट्यूबचे झाकण उघडून ते झाकण जिथून ट्यूब कापली आहे त्याभागातून आत घालावे. ट्यूबमध्ये झाकण फिट बसल्यानंतर दुसऱ्या हाताने त्या झाकणावर दाब देत ते खालच्या दिशेने ढकलत पुढे न्यावे. यामुळे ट्यूबच्या आतील भागात उरलेली, तसेच ट्यूबच्या आतील कडांना चिकटलेली क्रिम या झाकणाच्या प्रेशरने खाली सरकून ट्यूबच्या तोंडाशी येते.
असे केल्यानंतर लगेच या ट्यूबच्या आत उरलेली क्रिम, पेस्ट, लोशन अगदी सहजपणे बाहेर येण्यास मदत होते. यामुळे ट्यूब संपत आल्यावर आपल्याला हातांनी सारखी ट्यूब दाबावी किंवा पिळावी लागणार नाही. याचबरोबर ट्यूबच्या आत असलेली क्रिम, लोशन ,पेस्ट वाया न जाता अगदी सहजपणे आपण संपेपर्यंत वापरु शकतो.