Lokmat Sakhi >Social Viral > सुई- दोरा न वापरता अवघ्या १० सेकंदात कसा शिवायचा फाटका ड्रेस - १ भन्नाट ट्रिक पाहा

सुई- दोरा न वापरता अवघ्या १० सेकंदात कसा शिवायचा फाटका ड्रेस - १ भन्नाट ट्रिक पाहा

Home Hacks: एखादा फाटका कपडा सुई- दोरा न वापरता शिवतो येतो, हे खरं वाटत नसेल तर हा व्हिडिओ एकदा बघाच... (how to stitch ripped or torn clothes without using needle and thread)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2024 03:19 PM2024-05-29T15:19:32+5:302024-05-29T16:41:17+5:30

Home Hacks: एखादा फाटका कपडा सुई- दोरा न वापरता शिवतो येतो, हे खरं वाटत नसेल तर हा व्हिडिओ एकदा बघाच... (how to stitch ripped or torn clothes without using needle and thread)

how to stitch ripped or torn clothes without using needle and thread, simple trick for hiding torn clothes | सुई- दोरा न वापरता अवघ्या १० सेकंदात कसा शिवायचा फाटका ड्रेस - १ भन्नाट ट्रिक पाहा

सुई- दोरा न वापरता अवघ्या १० सेकंदात कसा शिवायचा फाटका ड्रेस - १ भन्नाट ट्रिक पाहा

Highlightsजीन्स, कॉटनची ओढणी, बेडशीट असा कोणताही प्रकारचा फाटका कपडा शिवण्यासाठी हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही.

कपडे शिवण्यासाठी किंवा कपड्यांना रफू करण्यासाठी सुई- दोरा लागतोच. या दोन्ही गोष्टी आपल्याकडे नसतील तर तात्पुरती पिन लावून आपल्याला वेळ मारून नेता येईल. पण या दोन्ही गोष्टींशिवाय एखादा फाटका कपडा कायमसाठी शिवणे किंवा रफू करणे शक्यच नाही, असं तुम्हालाही वाटत असेल तर ते चुकीचं आहे (simple trick for hiding torn clothes). ते कसं हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या काही टिप्स आणि व्हिडिओ पाहा.. (how to stitch ripped or torn clothes without using needle and thread)

 

सुई- दोरा न वापरता ड्रेस कसा शिवायचा?

सुई- दोरा न वापरता एका अतिशय सोप्या पद्धतीने अवघ्या काही सेकंदातच फाटका ड्रेस कसा शिवायचा किंवा कसा रफू करायचा याविषयीचा व्हिडिओ nambhajanmala या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

कशाला महागडी आमचूर पावडर विकत घेता? फक्त १० रुपयांत वर्षभरासाठी करून ठेवा- घ्या रेसिपी 

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला रिबल सिबल टेप लागणार आहे. यालाच काही ठिकाणी रिविल सिविल टेप असंही म्हणतात. हा टेप तुम्हाला शिलाईचं सामान मिळणाऱ्या कोणत्याही दुकानात मिळेल. 

रंगरूपावरून ट्रोल झालेली टॉपर प्राची निगमचा सल्ला, मुलींनो जे बिघडलेलेच नाही ते दुरुस्त का करता?

सगळ्यात आधी कपडा उलटा करून घ्या. यानंतर कपड्यावर जेवढा फाटला असेल तेवढ्या मापाचा टेप घ्या आणि तो फाटलेल्या भागावर ठेवा. त्यावर तुमच्या कपड्याला मॅचिंग असणारा एखादा कपड्याचा तुकडा ठेवा. 

 

आता त्याच्यावरून इस्त्री फिरवून घ्या. इस्त्रीच्या गरमपणामुळे टेपचा चिकटपणा त्या कपड्याच्या तुकड्याला तमच्या कापडाशी जोडून टाकेल. 

मुलांचं वजन वाढतच नाही- खूपच हडकुळे दिसतात? ५ पदार्थ रोज खाऊ घाला- तब्येत सुधारेल

धुतल्यानंतरही हा कपडा निघून जाणार नाही, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. जीन्स, कॉटनची ओढणी, बेडशीट असा कोणताही प्रकारचा फाटका कपडा शिवण्यासाठी तुम्ही या टेपचा उपयोग करू शकता. अशा पद्धतीने सुई- दोरा न वापरता कपडा चांगला जोडला जाईल. कधी तरी हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. 

 

Web Title: how to stitch ripped or torn clothes without using needle and thread, simple trick for hiding torn clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.