Join us  

घरात एखादी जखम झाली, भळाभळा रक्त आलं तर काय कराल ? ५ प्रथमोपचार, रक्तस्त्राव थांबेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2024 2:46 PM

5 Home Remedies to Stop Bleeding : Try These 5 Natural Effective Remedies To Stop Bleeding From Wounds : जखम झालेल्या भागांतून येणारे रक्त थांबवणे काहीवेळा शक्य होत नाही, अशावेळी काय करावे समजत नाही...

रोज काही ना काही काम करताना आपल्याला छोटी - मोठी दुखापत होऊ शकते. जखम जर छोटी असेल तर ती काही दिवसांत भरुन येते. याउलट जर काही गंभीर दुखापत झाली तर जखम भरून यायला वेळ लागतो. थोडेसे खरचटले किंवा छोटा कट लागला तर लगेच रक्त यायला सुरुवात होते. काहीवेळा हे रक्त लगेच थांबते तर कधी फार मोठ्या प्रमाणात रक्त येते व थांबतच नाही, अशावेळी काय करावे समजत नाही(How To Stop Bleeding From Cuts & Wounds).

जखम झालेल्या भागांतून येणारे रक्त थांबवणे काहीवेळा शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, आपण डॉक्टरकडे जाऊन उपचार घेतो. असे असले तरीही डॉक्टरकडे जाईपर्यंत आपण काही घरगुती उपचार करुन वाहणारे रक्त थांबवण्याचा प्रयत्न करतो. हे घरगुती उपचार नेमके कोणते व ते कसे करावेत, जेणेकरुन रक्त लगेच थांबले जाईल याबद्दल अधिक माहिती घेऊयात(Try These 5 Natural Effective Remedies To Stop Bleeding From Wounds).

वाहणारे रक्त थांबवण्यास काही घरगुती उपचार... 

१. हातांनीं प्रेशर द्यावे :- जखम किंवा कट झालेल्या भागातून जर फार मोठ्या प्रमाणांत रक्तस्त्राव होत असेल तर तो लगेच थांबवता येऊ शकतो. नॅशनल हेल्थ इन्स्टिट्यूटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, रक्तस्त्राव थांबवण्यासाठी घरगुती उपाय सांगितले आहेत. त्यानुसार रक्तस्त्राव झालेल्या जागेवर स्वच्छ सुती कापड ठेवून दोन्ही हातांनी दाब द्यावा. रक्तस्त्राव थांबेपर्यंत हळूहळू हातांनी दाब देत राहा. साधारण ५ ते १० मिनिटांनी आपण हा दाब देणे थांबवल्यास रक्तस्त्राव देखील थांबेल.

२. टी बॅगचा करा वापर :- दुखापत झाल्यास रक्तस्त्राव काही केल्या थांबत नसेल तर अशावेळी आपण ग्रीन टी बॅगचा वापर करु शकता. वाहणारे रक्त थांबवण्यासाठी वापरलेल्या ग्रीन टी च्या पिशव्या हा एक उत्तम घरगुती उपाय ठरु शकतो. रक्तस्त्राव झालेल्या ठिकाणी ही ग्रीन टी ची बॅग काही काळासाठी  ठेवा. यामुळे रक्तस्त्राव थांबेल आणि वेदना होणार नाहीत.

पदार्थ वारंवार गरम करताय? WHO सांगते, शिजवलेले अन्न पुन्हा पुन्हा गरम केले तर...

३. कोरफड जेल :- शरीरातील कोणत्याही प्रकारचा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी कोरफड जेल हा एक उत्तम उपाय होऊ शकतो. कोरफड जेलमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात, ज्यामुळे जखमा लवकर भरतात. ज्या भागावर दुखापत होऊन रक्तस्त्राव होत असेल, त्या भागावर कोरफडचे जेल लावा, रक्तस्त्राव लगेच थांबेल. सायन्स डायरेक्टमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, कोरफडमध्ये स्मॅनोन बायोएक्टिव्ह कंपाऊंड असते, ज्यामुळे जखम लवकर बरी होते.

जीन्स न धुता भरपूर वापरता? त्वचेचे आजार लागतील मागे, तज्ज्ञ सांगतात जीन्स धुताना काय करा...

४. पेट्रोलियम जेली :- आपल्या घरात पेट्रोलियम जेली असतेच. या पेट्रोलियम जेलीचा वापर करुन आपण वाहणारे रक्त थांबवू शकतो. त्याचबरोबर पेट्रोलियम जेलीमुळे कोणतीही जखम लवकर भरते. यासाठी बँडेजवर किंवा सुती पट्टीवर पेट्रोलियम जेली घेऊन ती जखमेवर गुंडाळा. पेट्रिलियम जेली रक्त शोषून ते  गोठवते, ज्यामुळे रक्तस्त्राव थांबतो. 

५. रक्त येणारा भाग वर उचलून धरा :- शरीराच्या ज्या भागाला दुखापत झाली असेल तो भाग वर उचलून धरावा. जर आपल्या हातापायांवर जखम झाली असेल तर हात - पाय वरच्या दिशेने करावेत. असे केल्याने रक्तस्त्राव लगेच रोखला जातो.

टॅग्स :सोशल व्हायरल