Lokmat Sakhi >Social Viral > पणत्यांमधून तेल गळून जमिनीवर तेलकट डाग पडू नये म्हणून ३ सोपे उपाय, डाग पडले तर काय ही चिंता विसरा...

पणत्यांमधून तेल गळून जमिनीवर तेलकट डाग पडू नये म्हणून ३ सोपे उपाय, डाग पडले तर काय ही चिंता विसरा...

Diwali Special : how to prevent oil leaking earthen clay lamp : पणती मधून गळणारे तेल व या तेलामुळे जमीन चिकट, तेलकट होऊ नयेत यासाठी हे ३ सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2023 02:55 PM2023-11-06T14:55:51+5:302023-11-06T15:10:23+5:30

Diwali Special : how to prevent oil leaking earthen clay lamp : पणती मधून गळणारे तेल व या तेलामुळे जमीन चिकट, तेलकट होऊ नयेत यासाठी हे ३ सोपे उपाय...

How to stop leaking oil from Diyas, How to avoid oil leakage from panati or diwali diya | पणत्यांमधून तेल गळून जमिनीवर तेलकट डाग पडू नये म्हणून ३ सोपे उपाय, डाग पडले तर काय ही चिंता विसरा...

पणत्यांमधून तेल गळून जमिनीवर तेलकट डाग पडू नये म्हणून ३ सोपे उपाय, डाग पडले तर काय ही चिंता विसरा...

दिवाळी म्हटलं की सण आला तो खास दिव्यांचा. दिवाळी हा सण दिव्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. दिवाळीला आपण घराबाहेर छान सुबक रंगीबेरंगी रांगोळी काढून दिव्यांची आरास करतो. दिवाळीला घराबाहेर व घरात आपण असंख्य दिवे लावून भरपूर रोषणाई करतो. दिवाळीचा सण हा दिव्यांच्या लक्ख प्रकाशाने अधिकच खुलून येतो. दिवाळीत जिथे पाहावे तिथे दिव्यांची आरास बघायला मिळते. दिवाळीत आपण घराबाहेर लावलेले दिवे हे बहुतेकवेळा वाऱ्याच्या झोताने वीजतात, असे दिवे सारखे सारखे पेटवावे लागतात किंवा ते विजू नये म्हणून त्यांची काळजी घ्यावी लागते. यावर एक सोपा उपाय म्हणून हल्ली बाजारांत विकत मिळणारे इलेक्ट्रॉनिक दिवे आपण सर्रास आणून त्याचा वापर करतो. हल्ली वेगवेगळे इलेक्ट्रिक दिवे, पाण्यात चालणारे दिवे, बॅटरीवरचे दिवे, वेगवेगळ्या आकर्षक लाईटिंग बाजारात पाहायला मिळतात. आपण त्या मोठ्या हौशीने खरेदीही करतो. परंतु असे असले तरीही पारंपरिक पद्धतीने दिवे आपल्या घराबाहेर लावल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. पारंपरिक दिव्यांची केलेली आरास हीच खरी शोभून दिसते(How to stop leaking oil from Diyas).

पारंपरिक पद्धतीने पणत्या लावल्या की नेमकी एक अडचण येते. सगळ्यात पहिली अडचण म्हणजे पणत्या खूप जास्त तेल शोषून घेतात. त्यामुळे मग तेलही खूप लागते. तसेच पणत्यांमधून जे तेल (stop oil leakage from lamps/diyas) झिरपते, त्यामुळे मग जमिनीवर तेलाचे डाग पडतात.असे होऊ नये म्हणून आपण ३ सोपे उपाय लक्षात ठेवूयात. हे उपाय केल्यामुळे पणती ठेवली त्या ठिकाणी जमिनीवर डागही पडणार नाहीत(How to avoid oil leakage from panati or diwali diya).

पणत्यांमधून तेल गळू नये म्हणून... 

१. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे बाजारातून आणलेल्या पणत्या जशाच्या तशाच लावू नका. पणत्या घरी आणल्यानंतर त्या ५ ते ६ तासांसाठी पाण्यात चांगल्या भिजू द्या. यासाठी एखादे खोलगट भांडे किंवा टब वापरा आणि त्यात सगळ्या पणत्या भिजत घाला. ५ ते ६ तासांनंतर पणत्या पाण्यातून बाहेर काढा. स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि वाळू द्या. अशा पणत्यांमधून तेल गळत नाही.

आता अनारसे फसणार नाहीत तर हसणार ! कुरकुरीत, जाळीदार, हलके - फुलके अनारसे होतील सहज सोपे...

२. दुसरा उपाय म्हणजे पाण्यात भिजवल्यानंतर पणत्या जेव्हा पुर्णपणे कोरड्या होतील, तेव्हा त्या पणतीला आतून- बाहेरून ॲक्रॅलिक रंग लावा. खूप बारीक रंगकाम करायला वेळ नसेल, तर सगळ्या पणतीवर रंगाचा एकच हात मारा. या दोन्ही उपायांमुळे निश्चितच तेल पणतीमधून गळणार नाही.   

मार्केट सारखी खमंग, कुरकुरीत, मसाला शेव बनवण्याची सोपी रेसिपी, चव अशी की शेव होईल फस्त...

३. पणत्यांमधून तेल गळून बाहेर सांडून त्या ठिकाणी तेलाचे चिकट डाग पडू नयेत म्हणून आपण तुपाच्या रेडीमेड वातींचा वापर करु शकतो. जेणेकरून या पणत्यांमधून तेल बाहेर सांडणार नाही. याउलट आपण मेणबत्तीच्या रेडिमेड दिव्यांचा देखील वापर करु शकतो. या दिव्यांमध्ये मेण असल्यामुळे तेल घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे तेल सांडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

शनिवार - रविवारची सुटी म्हणून सगळा फराळ एकाचवेळी करता ? ९ टिप्स - फराळ होईल सुटसुटीत - बिघडणारही नाही...

 

Web Title: How to stop leaking oil from Diyas, How to avoid oil leakage from panati or diwali diya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.