बाजारातून आपण महागडी फळे, भाज्या विकत आणतो. वारंवार बाजारात जाणं होत नाही. म्हणून एकदा गेलो की जरा जास्तच घेऊन येतो. पण घरी आल्यावर आपल्याकडून एवढ्या जास्त भाज्या किंवा फळं एकदम खाल्ले जात नाहीत. त्यामुळे ते खराब होऊ लागतात. लगेचच सडतात. मग शेवटी फेकून द्याव्या लागतात (How to keep fruits and vegetables fresh?). यामुळे पैसा वाया जातो. म्हणूनच असं होऊ नये आणि फळं किंवा भाज्या जास्त दिवस फ्रेश राहावेत, म्हणून नेमकी कशी काळजी घ्यायची ते आपण बघूया (How to store banana, tomato, watermelon for a long)...
केळी कशी साठवावी?
अनेकदा तर अर्धा डझन केळी आणली तरीही ती २- ३ दिवस खाल्ली जात नाहीत. कधी कधी तर त्यावर चिलटे बसून ती खराब होऊ लागते.
मलायका अरोराची ७५ हजारांची बनारसी साडी!! पोपटी रंगाच्या भरजरी साडीची पाहा खासियत
असं होऊ नये, म्हणून बाजारातून आणलेली केळी सगळ्यात आधी एका ओल्या टिशू पेपरने स्वच्छ पुसून घ्या. यानंतर दुसऱ्या टिशू पेपरने किंवा कपड्याने ती कोरडी करून घ्या. आता एक टिशू पेपर पाण्यात बुडवून थोडासा पिळून घ्या आणि तो ओलसर असतानाच केळीच्या देठावर गुंडाळून ठेवा. हा गुंडाळलेला टिशू पेपर ओलसर राहील याची काळजी घ्या. केळी खराब होणार नाहीत.
टोमॅटो साठवून ठेवण्यासाठी...
टोमॅटो सध्या खूप महाग झाले आहेत. त्यामुळे आपल्याला त्याची किंमत आता कळते आहे. टोमॅटो खराब होऊ नये म्हणून त्याच्या देठाला सेलोटेप लावून ठेवा. टोमॅटो सडणार नाही.
टरबूज कसे साठवावे?
टरबूज आणले की ते बऱ्याचदा उरते. एका दमात सगळे संपत नाही. त्यामुळे मग उरलेले टरबूज तसेच फ्रिजमध्ये ठेवून दिले जाते. असे केल्याने त्यावर बॅक्टेरिया जमा होतात.
पावसाळ्यात चिवडा वातड होऊ नये, पापड सादळू नयेत म्हणून करा फक्त ३ गोष्टी
त्यामुळे उरलेल्या टरबूजावर एक दोन लसूण पाकळ्या ठेवा. त्यावर प्लॅस्टिक पिशवीचे आवरण घाला आणि त्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवा.