खोबरेल तेल ही घरोघरी लागणारी वस्तू. काही घरांमध्ये सगळे कुटूंबच खोबरेल तेल लावते. तर काही घरांमध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या ब्रॅण्डचे खोबरेल तेल वापरणारे असले तरी त्यातला एक जण खोबरेल तेल वापरणारा नक्कीच असतो. आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. अशा वातावरणात जेव्हा सकाळी घाई- गडबडीत जेव्हा आपण खोबरेल तेलाची बाटली हातात घेतो आणि त्यातलं तेल गोठल्यामुळे अजिबात बाहेर येत नाही, तेव्हा फार चिडचिड होते (remedies for keeping coconut oil in liquid state in winter). जाम वैताग येतो. म्हणूनच आता हा एक उपाय करून पाहा. (How to store coconut oil in winter without freezing)
थंडीमुळे खोबरेल तेल गोठू नये यासाठी उपाय
कितीही थंडी पडली तरी खोबरेल तेल गोठू नये, यासाठी नेमका काय उपाय करावा याची माहिती indiakatadkaa या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
डिशवॉशर घ्यायचंय? बघा कमी जागेत मावणारे, वापरायला सोपे असे ३ पर्याय- काम होईल झटपट
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक बाजारात मिळणारं आमला तेल किंवा बदाम तेल लागणार आहे.
सगळ्यात आधी तर गोठलेलं खोबरेल तेल एका भांड्यात काढा आणि ते गॅसवर थोडं तापवून पातळ करून घ्या.
आता या पातळ झालेल्या खोबरेल तेलामध्ये आमला म्हणजेच आवळ्याचं तेल १ टेबलस्पून एवढ्या प्रमाणात टाका. आवळ्याचं तेल नसेल तर अलमंड ऑईल टाकलं तरी चालेल. हे तेल टाकल्यानंतर सगळं तेल एकदा व्यवस्थित हलवून घ्या.
हळदीच्या दुधात 'हे' २ पदार्थ घाला, मिळतील भरपूर फायदे- बघा हळदीचं दूध करण्याची योग्य पद्धत
असं केल्याने आवळा तेलात किंवा बदाम तेलामध्ये न गोठण्याचे जे गुणधर्म असतात, ते खोबरेल तेलामध्ये जातात. आणि त्यामुळे मग थंडी पडली तरी खोबरेल तेल गोठत नाही. उपाय अगदी सोपा आहे त्यामुळे करून पाहायला हरकत नाही.